मावस बहिणीशी बोलतो म्हणून १९ वर्षांच्या तरुणावर धारधार शस्त्राने खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 09:32 IST2024-12-20T09:32:00+5:302024-12-20T09:32:20+5:30
बारामती शहरातील धक्कादायक घटना : आरोपी फरार

मावस बहिणीशी बोलतो म्हणून १९ वर्षांच्या तरुणावर धारधार शस्त्राने खून
सांगवी (बारामती) : मावस बहिणीशी बोलत असल्याचा राग मनात धरून तिघांनी मिळून एका एकोणीस वर्षांच्या तरुणाच्या गळ्यावर, हातावर, चेह-यावर धारधार शस्त्राने सपासप वार करुन खून केल्याचा धक्कादायक प्रकार बारामतीतून समोर आला आहे. अनिकेत सदाशिव गजाकस (वय १९) रा.देसाई इस्टेट बारामती असे खून करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत मयत अनिकेतचा भाऊ अभिषेक सदाशिव गजाकस (वय २५), धंदा वकिल रा. देसाई ईस्टेट बारामती ता. बारामती जि. पुणे यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नंदकिशोर पंजाबराव अंभोरे (रा. प्रगतीनगर,ता. बारामती, जि. पुणे),महेश नंदकुमार खंडाळे रा.तांदुळवाडी रोड जिजामातानगर बारामती जि. पुणे),संग्राम खंडाळे पुर्ण नाव पत्ता माहीती नाही. अशी तरुणावर धारधार शस्त्राने वार करून खून करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. आरोपी फरार असून पोलिसांकडून तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी लोकमतशी बोलताना दिली.
गुरुवार (दि.१९) रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास प्रगतीनगर येथील क्रियेटीव्ह अॅकॅडमी कडुन टी.सी कॉलेजकडे येणारे रोडवर ही घटना घडली. प्रगतीनगर येथील क्रियेटीव्ह अॅकॅडमी कडुन टी.सी. कॉलेजकडे येणारे रोडवर मयत अनिकेत हा नंदकिशोर अंभोरे याची मावस बहिणीशी बोलत असल्याच्या राग मनात धरून आरोपी नंदकिशोर पंजाबराव अंभोरे, महेश नंदकुमार खंडाळे, संग्राम खंडाळे यांनी मिळुन अनिकेत सदाशिव गजाकस याच्या गळ्यावर, हातावर, चेह-यावर धारधार शस्त्राने सपासप वार करुन ठार मारले आहे. घटना स्थळी अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार,पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी भेट देऊन पाहणी केली.
सहा.पोलीस निरीक्षक गजानन चेके हे अधिक तपास करीत आहेत.