१९३ शेतकऱ्यांचा एकाच दिवशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:10 AM2021-02-14T04:10:49+5:302021-02-14T04:10:49+5:30

कृषी वसुलीत बारामती परिमंडल राज्यात अग्रेसर वसुलीचा गाठला ५० कोटींचा टप्पा बारामती : शासनाने कृषिपंपाची थकबाकी वसूल करण्यासाठी ...

193 farmers on the same day | १९३ शेतकऱ्यांचा एकाच दिवशी

१९३ शेतकऱ्यांचा एकाच दिवशी

Next

कृषी वसुलीत बारामती

परिमंडल राज्यात अग्रेसर

वसुलीचा गाठला ५० कोटींचा टप्पा

बारामती : शासनाने कृषिपंपाची थकबाकी वसूल करण्यासाठी आणलेल्या ‘कृषिपंप धोरण-२०२०’ अंतर्गत कृषी योजनेची अंमलबजावणी राज्यात सर्वत्र सुरू आहे. कडेगाव विभागातील १९३ शेतकऱ्यांनी एकाच दिवशी तब्बल ८२ लाख २२ हजार रुपये एकरकमी भरून वीजबिल कोरे करण्याची संधी पटकावली आहे. परिणामी कृषी वसुलीत राज्यात अग्रेसर असलेल्या बारामती परिमंडलाने ५० कोट्टींचा टप्पा गाठला आहे.

मुख्य अभियंता सुनील पावडे यांच्या नेतृत्वाखाली महावितरणचे अधिकारी-कर्मचारी वसुलीसाठी गावोगावी शेतकरी मेळावे आयोजित करत आहेत. बारामती परिमंडलात पुणे जिल्ह्यातील ६ तालुके तर सोलापूर व सातारा हे दोन जिल्हे येतात. शेतीपंपाचे एकूण ७ लाख ३६ हजार ग्राहक असून, त्यांच्याकडे सप्टेंबर २०२० अखेर तब्बल ८ हजार १४४ कोटी थकबाकी आहे. कृषी धोरणांतर्गत थकबाकीचे पुर्नगठण करून ही थकबाकी ५ हजार ९२५ कोटी इतकी झाली आहे. त्याच्या केवळ ५० टक्के व चालू देयक असे मिळून ३ हजार २२५ कोटी इतकी रक्कम भरावयाची असल्याने शेतकरी एकरकमी थकबाकी भरत आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी भरलेल्या रकमेतील ३३ टक्के रक्कम गावपातळीवर व ३३ टक्के जिल्हापातळीवर वीज यंत्रणेच्या बळकटीसाठीच वापरली जाणार आहे.

तर केडगाव विभागांतर्गत मांडवगण फराटा व पारगाव येथे गुरुवारी (दि.११) झालेल्या मेळाव्यात १९३ शेतक-यांनी अनुक्रमे ५५ लाख ६० हजार व २५ लाख ६० हजार इतकी रक्कम भरल्यामुळे ८२ लाखांची विक्रमी वसुली झाली असून, केडगाव विभागाने वसुलीत २ कोटींची मजल मारली आहे. या सर्व शेतक-यांचा कार्यकारी अभियंता राजेंद्र येडके यांनी सत्कार करत इतर शेतक-यांनाही थकबाकी भरण्याचे आवाहन केले आहे. यावेळी उपकार्यकारी अभियंता सोमनाथ माने, संजय मालपे यांचेसह शाखा अभियंते पप्पू पिसाळ, मतिन मुलाणी व त्यांचे कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: 193 farmers on the same day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.