खडकवासला धरण प्रकल्पात १९.५१ टीएमसी पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:12 AM2021-03-08T04:12:23+5:302021-03-08T04:12:23+5:30
गेल्या वर्षी पुण्यासह राज्यात सर्वत्र दमदार पाऊस झाला. काही ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करण्याची परिस्थिती निर्माण झाली. परिणामी, पुण्यासह ...
गेल्या वर्षी पुण्यासह राज्यात सर्वत्र दमदार पाऊस झाला. काही ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करण्याची परिस्थिती निर्माण झाली. परिणामी, पुण्यासह राज्यातील बहुतांश सर्वच धरणे १०० टक्के भरली. त्यामुळे यंदा पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता कमी आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा खडकवासला धरण प्रकल्पात २.३१ टीएमसी एवढे पाणी अधिक आहे.
वरसगाव, टेमघर, पानशेत आणि खडकवासला धरणातील पाण्यासह आता पुण्यातील काही भागाला आंद्रा धरणातील पाणी मिळणार आहे. त्यामुळे खडकवासला धरण प्रकल्पावर येणारा भार कमी झाला आहे. परिणामी, प्रकल्पातून शेतीसाठी पाणी सोडणे अधिक शक्य होणार आहे. सुमारे आठवड्याभरापूर्वी खडकवासला धरणातून शेतीसाठी आवर्तन सोडण्यात आले असून सोडलेले आवर्तन पूर्ण झाल्यानंतर पाटबंधारे विभागाकडून शेतीसाठी आणखी एक आवर्तन सोडले जाणार आहे.
---
खडकवासला धरण प्रकल्पातील पाणीसाठ्याची आवकडेवारी
टेमघर : ०.५१
वरसगाव : ८.९१
पानशेत : ९.१६
खडकवासला : ०.९४