काश्मीरमधील ‘डॅगर परिवार स्कूल’चा पहिला वर्धापनदिन उत्साहात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2022 10:27 PM2022-11-05T22:27:18+5:302022-11-05T22:28:00+5:30
Pune News: पुण्यातील इंद्राणी बालन फाउंडेशन व भारतीय लष्कर यांच्या वतीने काश्मीर खोऱ्यातील दिव्यांग मुलांसाठी स्थापन केलेल्या ‘डॅगर परिवार स्कूल’चा पहिला वर्धापनदिन नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला.
पुणे : पुण्यातील इंद्राणी बालन फाउंडेशन व भारतीय लष्कर यांच्या वतीने काश्मीर खोऱ्यातील दिव्यांग मुलांसाठी स्थापन केलेल्या ‘डॅगर परिवार स्कूल’चा पहिला वर्धापनदिन नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. फाउंडेशनचे अध्यक्ष पुनीत बालन आणि जान्हवी धारीवाल-बालन हे याला आवर्जून उपस्थित होते.
काश्मीरमधील बारामुल्ला येथील या स्कूलमध्ये विविध वैद्यकीय समस्या असलेली ७५ मुले आहेत. या शाळेचा पहिला वर्धापनदिन दि. १ नोव्हेंबर रोजी साजरा झाला. यानिमित्त विद्यार्थ्यांनी समूहनृत्य, समूह गीत, सोलो डान्स सादर केले. मुख्याध्यापिका साबिया फारूक यांनी प्रथम वार्षिक अहवाल सादर केला. शाळेचे वर्षभरातील कामकाज आणि प्रगती पाहून जान्हवी धारिवाल-बालन आणि पुनीत बालन यांनी कौतुक केले.
व्हीएसएम, जीओसी १९ इन्फंट्री डिव्हिजन मेजर जनरल अजय चंदपुरिया यांनी याप्रसंगी मुलांच्या पालकांशी संवाद साधला. बारामुल्ला येथील
उपजिल्हाधिकारी कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामुल्ला आणि शिक्षण विभाग बारामुल्ला यांनीही प्रोत्साहन दिले. स्थानिक काश्मिरी नागरिकांना शक्य ते सर्वप्रकारे पाठिंबा देण्याच्या भारतीय सैन्याच्या संकल्पावर लोकांचा विश्वास आणखी दृढ केला.
फाउंडेशनचे अध्यक्ष पुनीत बालन म्हणाले की, भारताच्या संस्कृतीच्या इतिहासात काश्मीरचे योगदान अत्यंत मोठे आहे. आज या मुलांनी आपल्या
कामगिरीतून देशाची समृद्ध संस्कृतीचं जे दर्शन घडवलं ते पाहून आम्हाला अतिशय आनंद झाला.