ओतूर शहरात २ कोरोना पाॅझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:11 AM2021-02-14T04:11:46+5:302021-02-14T04:11:46+5:30
ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्र कक्षेत २७ जानेवारीपासून पुन्हा विविध गावांत कोरोनाचे रुग्ण सापडू लागले आहेत. तेजेवाडी गावात दोन ...
ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्र कक्षेत २७ जानेवारीपासून पुन्हा विविध गावांत कोरोनाचे रुग्ण सापडू लागले आहेत.
तेजेवाडी गावात दोन दिवसांत ६ कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण
सापडले. १३ फ़ेब्रुवारीस एकाच कुटुंबातील पती-पत्नी असा दोन कोरोनाबाधित सापडले. त्यांना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले व उपचार सुरू केले आहेत, अशी माहिती ओतूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी सारोक्ते यांनी दिली .
ओतूर शहरातील कोरोनाबाधितांची संख्या ४६२ झाली आहे. त्यापैकी ४३४ बरे झाले आहेत. ५ जण उपचार घेत आहेत. २३ जणांचा मृत्यू झाला आहे.
ओतूर परिसरात ९०३ बाधितांची संख्या झाली आहे. त्यापैकी ८४४ रुग्ण बरे झाले आहेत. १२ जण उपचार घेत आहेत. १ जण घरीच उपचार घेत आहे. ४६ जणांचा मृत्यू झाला आहे, असे डॉ. श्रीहरी सारोक्ते म्हणाले .