खेड तालुक्यातील रस्ते व पूल दुरुस्ती कामासाठी २ कोटी २४ लाख मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:12 AM2021-03-27T04:12:38+5:302021-03-27T04:12:38+5:30

शेलपिंपळगाव : खेड तालुक्यात अतिवृष्टी तसेच पूरहानीमुळे नुकसान झालेल्या रस्ते तसेच पूल दुरुस्ती कामासाठी आमदार दिलीप मोहिते-पाटील व जिल्हा ...

2 crore 24 lakhs sanctioned for road and bridge repair work in Khed taluka | खेड तालुक्यातील रस्ते व पूल दुरुस्ती कामासाठी २ कोटी २४ लाख मंजूर

खेड तालुक्यातील रस्ते व पूल दुरुस्ती कामासाठी २ कोटी २४ लाख मंजूर

Next

शेलपिंपळगाव : खेड तालुक्यात अतिवृष्टी तसेच पूरहानीमुळे नुकसान झालेल्या रस्ते तसेच पूल दुरुस्ती कामासाठी आमदार दिलीप मोहिते-पाटील व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्या प्रयत्नांतून सुमारे २ कोटी २४ लाख रुपये रकमेच्या निधीला पुणे जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे.

अतिवृष्टी व पूरहानीमुळे तालुक्यातील विविध रस्त्यांची तसेच पुलांची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाल्याने स्थानिकांना दळणवळण करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित रस्त्यांची तसेच पुलांची आवश्यक दुरुस्तीची कामे मार्गी लावण्याची मागणी खेड तालुक्यातील गावांमधून केली जात होती. नागरिकांची ही बाब लक्षात घेऊन आमदार दिलीप मोहिते पाटील व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी संबंधित कामांसाठी बांधकाम विभागाकडे निधी मंजूर करण्यासाठी पाठपुरावा केला.

त्यानुसार दरावस्ती कनेरसर इजिमा ४९ (१५ लक्ष), प्रजिमा १९ ते आमराळवाडी ते रामा १२९ ला जोडणारा मार्ग (१० लक्ष), गाडकवाडी ते वरुडे रस्ता (१० लक्ष), वाफगाव ते मांदळवाडी रस्ता (१० लक्ष), कडूस ते मुसळेवाडी रस्ता (१० लक्ष), रामा १०३ जऊळके खुर्द !! रस्ता (१० लक्ष), कडधे - दरा ठाकर वस्तीकडे जाणारा रस्ता (१० लक्ष), आळंदी मरकळ रोड ते ठाकरवाडी ग्रामा १४९ (१० लक्ष), पिंपळगाव रामा ११६ मरकळ - कोयाळी रस्ता करणे (९४ लक्ष), शिनोली - फदालेवाडी ते वरची सुपेवाडी रस्ता करणे (४५ लक्ष) अशा दहा गावांतील विकासकामासाठी २ कोटी २४ लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

--

कोट

अतिवृष्टी तसेच पूरहानीमुळे तालुक्यातील काही ठिकाणचे रस्ते व पुलांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. यापार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार तसेच विकास कामांना चालना देण्यासाठी बांधकाम विभागाकडून आवश्यक कामांना निधी उपलब्ध करून दिला आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी त्यास प्रशासकीय मान्यता दिली आहे.

- निर्मला पानसरे, अध्यक्षा, जिल्हा परिषद पुणे.

Web Title: 2 crore 24 lakhs sanctioned for road and bridge repair work in Khed taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.