२ दिवस शोधमोहीम सुरु! अखेर १३ वर्षीय सुनीलचा मृतदेह निरा डाव्या कालव्यात सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 20:08 IST2024-12-18T20:07:01+5:302024-12-18T20:08:51+5:30

रविवारी सकाळी मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला असता त्याने पाण्यात उडी मारली, पण त्यानंतर तो वर आलाच नाही

2-day search begins! 13-year-old Sunil's body finally found in Nira Left Canal | २ दिवस शोधमोहीम सुरु! अखेर १३ वर्षीय सुनीलचा मृतदेह निरा डाव्या कालव्यात सापडला

२ दिवस शोधमोहीम सुरु! अखेर १३ वर्षीय सुनीलचा मृतदेह निरा डाव्या कालव्यात सापडला

सोमेश्वरनगर (बारामती: सोमेश्वर सहकारी साखर कारखाना परिसरात ऊसतोड करण्यासाठी आलेल्या बीड येथील ऊसतोडणी मजूर किसन सव्वाशे यांचा १३ वर्षांचा मुलगा सुनील किसन सव्वाशे हा रविवारी (दि. १५) निरा डावा कालव्यात बुडाला. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथकाला दोन दिवसांच्या शोधमोहिमेनंतर सुनीलचा मृतदेह निरा डाव्या कालव्यात शोधण्यात यश आले आहे.

सुनील हा रविवारी सकाळी अकराच्या दरम्यान आपल्या मित्रांसोबत ऊसतोडणी कामगार वसाहत शेजारी निरा डाव्या कालव्यावर पोहण्यासाठी आला होता. त्याने कालव्यात पोहण्यासाठी उडी मारली. त्यानंतर तो पाण्यातून वर आलाच नाही. रविवारपासून स्थानिकांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा शोध लागला नाही. सोमवारी (दि. १६) रोजी दुपारी एकच्या दरम्यान पुणे येथील आपत्ती व्यवस्थापनची टीम सोमेश्वर कारखाना परिसरात दाखल झाल्यानंतर त्यांनी निरा डावा कालवा परिसरातील मळशी लोखंडी पूल येथे त्याचा शोध घेतला. पाच ते सहा तासाहून अधिक वेळ प्रयत्न करूनही त्यांना बुडालेल्या सुनीलचा तपास लागला नाही. आपत्ती व्यवस्थापन टीम ने पुन्हा दुसऱ्या दिवशी शोधमोहीम सुरू केली. बुधवारी (दि. १७) दुपारी सुनीलचा मृतदेह सोमेश्वर कारखान्याच्या मागील बाजूस निरा डाव्या कालव्यात शोधण्यात टीमला यश आले. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन टीमचे अधिकारी सुशीलकुमार सेठी यांच्यासह पथकातील २० कर्मचाऱ्यांनी ही शोधमोहीम घेतली. वडगाव निंबाळकर पोलिस व बारामती महसूल विभागाने त्यांना मदत केली.

Web Title: 2-day search begins! 13-year-old Sunil's body finally found in Nira Left Canal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.