मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी २ लाखांची लाच; पोलिसासह झिरो पोलीस जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2022 10:40 AM2022-11-30T10:40:10+5:302022-11-30T10:40:25+5:30

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची रात्री उशिरा कारवाई

2 lakh bribe for not filing a case of mobile theft Zero police with police in net | मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी २ लाखांची लाच; पोलिसासह झिरो पोलीस जाळ्यात

मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी २ लाखांची लाच; पोलिसासह झिरो पोलीस जाळ्यात

googlenewsNext

पुणे : मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी २ लाख रुपयांची लाच मागून त्यापैकी ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पोलीस कर्मचार्‍यासह खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई खडकी परिसरात मंगळवारी रात्री उशिरा केली आहे. 

पोलीस शिपाई दीपक प्रल्हाद क्षीरसागर (वय ३४) गुन्हे शाखा युनिट ३ आणि सिमोन अविनाश साळवी (वय २७) अशी पकडलेल्या दोघांची नावे आहेत.  याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या भावाला मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात आरोपी न करणे व अटक न करणे यासाठी पोलीस शिपाई दीपक क्षीरसागर याने २ लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधला़ त्यांच्या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर त्याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर खडकी परिसरात मंगळवारी रात्री उशिरा सापळा रचला. तक्रारदाराकडून सिमोन साळवी याने ३० हजार रुपये स्वीकारताना पकडण्यात आले. त्यानंतर क्षीरसागरलाही ताब्यात घेण्यात आले.

Web Title: 2 lakh bribe for not filing a case of mobile theft Zero police with police in net

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.