केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने ज्येष्ठाला २ लाखांचा गंडा
By भाग्यश्री गिलडा | Published: March 11, 2024 03:28 PM2024-03-11T15:28:27+5:302024-03-11T15:29:30+5:30
युनियन बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी असल्याचे सांगून तुमचे घोलेरोड येथील शाखेत असलेल्या बँक खात्याचे केवायसी अपडेट करायचे बाकी आहे, असे सांगितले होते
पुणे : बँकेचा कर्मचारी बोलत असल्याचे सांगून केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने ज्येष्ठाला गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत एरंडवणे परिसरात राहणाऱ्या नारायण दत्तात्रय निमकर (७०) यांनी रविवारी (दि. १०) डेक्कन पोलिसांना फिर्याद दिली आहे.
अधिक माहितीनुसार, फिर्यादींना ८ मार्च २०२४ रोजी अनोळखी मोबाइल क्रमांकावरून फोन आला. युनियन बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी असल्याचे सांगून तुमचे घोलेरोड येथील शाखेत असलेल्या बँक खात्याचे केवायसी अपडेट करायचे बाकी आहे, आजची शेवटची तारीख आहे असे सांगितले. त्यानंतर पॅन कार्ड अपडेट करण्यासाठी फिर्यादींना एक लिंक पाठवपवार लिंक ओपन करून त्यात खासगी माहिती भरली. या माहितीचा वापर करून फिर्यादींच्या खात्यातून परस्पर २ लाख १३ हजार रुपये काढून घेतले. त्यांनतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ पोलिस ठाण्यात धाव घेतली. याबाबत डेक्कन पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक साळुंखे करत आहेत.