कमला नेहरु हॉस्पिटलमध्ये २ वर्षाच्या मुलीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2020 10:41 PM2020-10-29T22:41:03+5:302020-10-29T22:41:19+5:30
kamla nehru Hospital डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा आरोप
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कमला नेहरु हॉस्पिटलमध्ये एमआरआयसाठी आणलेल्या २ वर्षाच्या मुलीचा अचानक मृत्यु झाला. याप्रकरणी मुलीच्या नातेवाईकांनी, डॉक्टरांनी भुलीचं इंजेक्शन दिल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. शिवन्या दिनेश सोनवणे (वय २ वर्षे, रा. नाना पेठ) असे या मुलीचे नाव आहे.
याबाबत फरासखाना पोलिसांनी सांगितले की, सोनवणे हे मुळचे उरण येथील राहणारे असून सध्या ते नाना पेठेत राहतात. शिवन्या हिचा एमआरआय काढण्यासाठी तिला गुरुवारी दुपारी कमला नेहरु हॉस्पिटलमध्ये आणले होते. त्यावेळी तिला भुलीचे इंजेक्शन देण्यात आले होते. काही वेळातच शिवन्या हिचा मृत्यु झाला. हा प्रकार तेथे असलेल्या भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आला. त्यांनी याची फरासखाना पोलिसांकडे तक्रार केली.
पोलीस निरीक्षक दादा गायकवाड यांनी सांगितले की, या प्रकरणी अकस्मात मृत्यु अशी नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाची ससून रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या समितीने चौकशी करावी, अशी विनंती करण्यात आली आहे. डॉक्टरांची समिती चौकशी करून अहवाल देईल. या अहवालानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे.