वीस दिवसांत वीस कोटींची वसुली
By admin | Published: November 24, 2014 11:56 PM2014-11-24T23:56:08+5:302014-11-24T23:56:08+5:30
शहरातील 2क्क् मिळकतधारकांनी सुमारे 20 कोटी 50 लाख रुपये पालिकेकडे जमा केले असल्याची माहिती करआकारणी आणि करसंकलन विभागाचे प्रमुख सुहास मापारी यांनी दिली.
Next
पुणो : थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेने नेमलेल्या बँड-बाजा पथकाच्या धास्तीमुळे 1 ते 22 नोव्हेंबर या कालावधीत शहरातील 2क्क् मिळकतधारकांनी सुमारे 20 कोटी 50 लाख रुपये पालिकेकडे जमा केले असल्याची माहिती करआकारणी आणि करसंकलन विभागाचे प्रमुख सुहास मापारी यांनी दिली.
दरम्यान, सुमारे 27 लाखांची थकाबाकी न भरल्याने ढोले-पाटील रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील एम्पायर मँफसिस सॉफ्टवेअर कंपनीचे तसेच 2 लाख 15 हजार रुपयांच्या थकबाकीसाठी बिबवेवाडी येथील पटेल यांची मिळकत सिल करण्यात आल्याचेही मापारी यांनी सांगितले.
महापालिकेच्या चालू वर्षाच्या अंदाजपत्रकात जमा-खर्चात मोठय़ा प्रमाणात तूट आल्याने थकबाकी वसुलीवर महापालिका प्रशासनाकडून भर देण्यात आला आहे. त्यानुसार, मिळकतकर विभागाकडून ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
9क्क् कोटी
रुपयांचे उद्दिष्ट
42क्14-15च्या अंदाजपत्रकात मिळकतकर विभागास सुमारे 9क्क् कोटी रुपयांच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट देण्यात आले असून, 23 नोव्हेंबर्पयत या विभागाने सुमारे 621 कोटी रुपये कराची वसुली केली असल्याचेही मापरी यांनी सांगितले.