ऑनलाईन ऑर्डर केल्यास भरपूर कमिशन मिळेल असे सांगून २० लाखांची फसवणूक

By भाग्यश्री गिलडा | Published: October 4, 2023 02:53 PM2023-10-04T14:53:12+5:302023-10-04T14:53:24+5:30

तक्रारदार यांनी आमिषाला बळी पडून त्यांच्या शॉपिंग प्लॅटफॉर्म वरून एकूण २० लाख ५९ हजारांच्या वेगवेगळ्या ऑर्डर प्लेस केल्या

20 lakh fraud by saying that ordering online will give you a lot of commission | ऑनलाईन ऑर्डर केल्यास भरपूर कमिशन मिळेल असे सांगून २० लाखांची फसवणूक

ऑनलाईन ऑर्डर केल्यास भरपूर कमिशन मिळेल असे सांगून २० लाखांची फसवणूक

googlenewsNext

पुणे: एका नामांकित कंपनीला प्रॉडक्ट एक्स्पोजर हवे असल्याचे सांगून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत सचिदानंद रामदासजी सातपुते (वय - ४२, रा. कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार ३० सप्टेंबर २०२३ रोजी संध्याकाळच्या सुमारास घडला आहे. फिर्यादीत म्ह्टल्याप्रमाणे आरोपी रेखा रंजन, रशीद, आदित्य आणि बजाज यांनी संगनमत करून सातपुते यांची फसवणूक केली आहे. 

सातपुते यांना अनोळखी क्रमांकावरून फोन आला. एफके मॉल मधून बोलत असल्याचे त्यांना सांगितले. अमेझॉन कंपनीला प्रॉडक्ट एक्स्पोजर हवे आहे. त्यासाठी तुमची निवड झाल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या शॉपिंग प्लॅटफॉर्मवरून ऑर्डर प्लेस केल्यावर चांगले कमिशन मिळेल असे सातपुते यांना सांगण्यात आले. तक्रारदार यांनी आमिषाला बळी पडून त्यांच्या शॉपिंग प्लॅटफॉर्म वरून एकूण २० लाख ५९ हजारांच्या वेगवेगळ्या ऑर्डर प्लेस केल्या. मात्र भरलेल्या पैश्यांचा कोणताही परतावा मिळाला नाही म्हणून विचारणा केली असता प्रतिसाद मिळाला नाही. आपली फसवणूक झळयाचे लक्षात येताच सातपुते यांनी तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी आरोपींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक शिळमकर पुढील तपास करत आहेत.

Web Title: 20 lakh fraud by saying that ordering online will give you a lot of commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.