स्पीड पोस्टद्वारे मागितली २० लाखांची खंडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:09 AM2021-06-04T04:09:04+5:302021-06-04T04:09:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : स्पीड पोस्टद्वारे पत्र पाठवून ४२ वर्षांच्या व्यक्तीला जिवे मारण्याची धमकी देऊन आॅनलाईन २० लाख ...

20 lakh ransom demanded by Speed Post | स्पीड पोस्टद्वारे मागितली २० लाखांची खंडणी

स्पीड पोस्टद्वारे मागितली २० लाखांची खंडणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : स्पीड पोस्टद्वारे पत्र पाठवून ४२ वर्षांच्या व्यक्तीला जिवे मारण्याची धमकी देऊन आॅनलाईन २० लाख रुपये खंडणी मागण्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच स्वारगेट परिसरातील एका बँक मॅनेजरच्या विरोधात दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी धमकी देण्यात आली आहे.

याप्रकरणी मार्केट यार्ड परिसरातील एका ४२ वर्षांच्या व्यक्तीने मार्केट यार्ड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

फिर्यादी यांनी स्वारगेट परिसरातील एका बँक मॅनेजरच्या विरोधात स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. चौकशीअंती काही तथ्य न आढळल्याने तो अर्ज फाईल करण्यात आला. दरम्यान, फिर्यादी यांना १३ मे रोजी एक निनावी पत्र आले. त्यामध्ये संबंधित बँक मॅनेजरच्या विरोधात दाखल केलेली तक्रार मागे घे, तसेच माझ्या बँक खात्यावर ऑनलाईन २० लाख रुपये जमा कर, नाही तर तुला व तुझ्या परिवाराला जिवे ठार मारून टाकील, अशी धमकी दिली आहे. फिर्यादीने न्यायालयात धाव घेऊन खासगी तक्रार केली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: 20 lakh ransom demanded by Speed Post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.