ओतूर परिसरात दोन दिवसांत २० रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:11 AM2021-07-28T04:11:36+5:302021-07-28T04:11:36+5:30
ओतूर परिसर कोरोना मुक्तीकडे वाटचाल करीत असल्याचे चित्र समोर आल्याचे वाटत असताना दि. २६ जुलै पासून परिसरात सोमवारी ...
ओतूर परिसर कोरोना मुक्तीकडे वाटचाल करीत असल्याचे चित्र समोर आल्याचे वाटत असताना दि. २६ जुलै पासून परिसरात सोमवारी ९ तर मंगळवारी ११ नवीन रुग्ण सापडल्याने परिसरात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे
मंगळवारी उदापूर येथे ७ ओतूर ,नेतवडमाळवाडी ,बल्लाळवाडी ,तेजेवाडी येथे एक एक असे ११ नवीन रुग्ण सापडल्याने दोन दिवसात तब्बल २० रुग्ण सापडले आहेत. उदापूर येथे नवीन ७ रुग्णामुळे तेथील बाधितांची संख्या २५४ झाली आहे. २२५ बरे झाले आहेत . १८ जणावर उपचार सुरू केले आहेत. ११जणांचा मृत्यू झाला आहे.
ओतूर ची बाधितांची संख्या १२०४ झाली आहे. ११५१ बरे झाले आहेत. १२ जण उपचार घेत आहेत. ४१जणांचा मृत्यू झाला आहे. नेतवडमाळवाडी तील ९०पैकी ८३ बरे झाले आहेत.