सामुहिक बलात्कार प्रकरणात चौघांना 20 वर्ष सक्तमजुरी  : महिलेला सुनावलेली महाराष्ट्रातील पहिली शिक्षा 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2019 05:43 PM2019-01-10T17:43:00+5:302019-01-10T17:45:50+5:30

शाळेस सुट्टी  असताना नातेवाईकांकडे राहण्यास गेलेल्या बारा वर्षाच्या मुलीवर सामुहिक बलात्कार केल्याच्या प्रकरणात महिलेसह चौघांना विशेष न्यायाधीश एस. के. कर्‍हाळे यांनी 20 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.

20 year inprionment in gange rape case | सामुहिक बलात्कार प्रकरणात चौघांना 20 वर्ष सक्तमजुरी  : महिलेला सुनावलेली महाराष्ट्रातील पहिली शिक्षा 

सामुहिक बलात्कार प्रकरणात चौघांना 20 वर्ष सक्तमजुरी  : महिलेला सुनावलेली महाराष्ट्रातील पहिली शिक्षा 

Next

पुणे  : शाळेस सुट्टी  असताना नातेवाईकांकडे राहण्यास गेलेल्या बारा वर्षाच्या मुलीवर सामुहिक बलात्कार केल्याच्या प्रकरणात महिलेसह चौघांना विशेष न्यायाधीश एस. के. कर्‍हाळे यांनी 20 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. सामुहिक बलात्कारातन्यायालयाने सहआरोपी महिलेला सुनावलेली महाराष्ट्रातील पहिलीच शिक्षा आहे.   

13 एप्रिल 2016 ते 25 मे 2016 दरम्यान रक्षक नगर, केशवनगर, मुंढवा येथील पिंगळे वस्ती हा प्रकार घडला. खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील राजेश कावेडीया यांनी काम पाहिले.  सहायक पोलिस निरीक्षक पल्लवी मेहर यांनी गुन्ह्याचा तपास केला.मनोज सुरेश जाधव (21), वर्षा धनराज गायकवाड (32),  अजय दिपक जाधव (22 तिघेही रा.  सर्वोदय कॉलनी, आनंदनगर, मुंढवा) आणि प्रशांत गुरूनाथ गायकवाड (28, रा. रक्षकनगर, खराडी) अशी शिक्षा सुनाविन्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. याबाबत बारा वर्षीय पिडीत मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे.    

                       पिडीत मुलगी नातेवाईकांकडे सुटीस आली होती. तिला आरोपी वर्षा ही रक्षकनगर येथील आरोपी प्रशांत गायकवाड याच्या फ्लॅटवर घेऊन गेली. त्यानंतर आरोपी मनोज जाधव याच्याबरोबर पीडितेला गप्पा मारण्यास बसविले. दरम्यान, वर्षाने मनोज तुला कसा वाटतो, तु त्याच्याशी बोलत जा, त्याच्याबरोबर लग्न कर, शरीर संबंध ठेवण्यास सांगून सगळी मदत करण्याचे आश्‍वासन दिले.  याच दरम्यान, 14 मे 2016 रोजी वर्षाने पिडीतेला मुंढवा येथील पिंगळे वस्ती येथील सदनिकेत नेले. प्रशांत आणि अजयने तिचे हात पाय धरले. त्यानंतर मनोजने तिच्यावर बलात्कार केला.

                   अतिरिक्त सरकारी वकील राजेश कावेडिया  यांनी सात साक्षीदार तपासले.  ज्या महिलेनी अशा प्रसंगात पिडीत मुलीला संरक्षण देण्याची गरज होती, तिनेच इतर आरोपींच्या वाईट कृत्यास साथ देऊन पिडीतेला मानसिक धक्का पोहचेल असे कृत्य केले, असा युक्तीवाद अ‍ॅड. कावेडिया यांनी करताना चौघांनाही जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी केली.  खटल्यात मुलीची साक्ष आणि वैद्यकीय पुरावे महत्वाचे ठरले. न्यायालयाने बलात्कार, सामुहिक बलात्कार, संगणमत, विनयभंग, बाल लैंगिक अत्याचाराच्या विविध कलमांन्वये चौघाही आरोपींना शिक्षा सुनावली.


माझ्या मुलीला न्याय मिळाला :न्यायालायने दिलेल्या या निकालामुळे माझ्या मुलीला न्याय मिळाला. त्यामुळे न्यायपलीकेवरील माझा विश्वास आणखी वाढला आहे. अनैतिक संबंधात असा कोणाचा बळी जाऊ नये.  

Web Title: 20 year inprionment in gange rape case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.