Corona Vaccination: पुणे शहरात शनिवारी १८६ केंद्रांवर प्रत्येकी २०० कोव्हिशिल्ड लस उपलब्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2021 09:02 PM2021-09-10T21:02:31+5:302021-09-10T21:03:55+5:30
लसीकरणाच्या ऑनलाईन बुकिंग करिता सकाळी ८ वाजता स्लॉट ओपन होणार
पुणे : पुणे महापालिकेला शासनाकडून ३० हजार कोव्हिशिल्ड लस प्राप्त झाल्यामुळे शनिवार ११ सप्टेंबरला १८६ लसीकरण केंद्रांवर प्रत्येकी २०० लसीचे डोस महापालिकेकडून वितरित करण्यात आले आहेत. दरम्यान शहरातील कुठल्याही महापालिकेच्या केंद्रावर व दवाखान्यात कोव्हॅक्सिन लस उपलब्ध राहणार नाही.
लसीच्या उपलब्ध साठ्यापैकी १८ वर्षांवरील नागरिकांना १५ टक्के लस ही ऑनलाईन बुकिंगव्दारे, तर १५ टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून पहिला डोस म्हणून मिळणार आहे. तर कोव्हिशिल्ड लसीच्या उर्वरित साठ्यापैकी ३५ टक्के लस ही ८४ दिवस पूर्ण झालेल्यांना ( १८ जून पूर्वी लस घेतलेल्यांना) ऑनलाईन बुकिंगव्दारे तर ३५ टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून दुसरा डोस म्हणून मिळणार आहे.
यानंतरही लस शिल्लक राहिल्यास ऑन स्पॉट नोंदणी करून उपस्थित नागरिकांना लस देण्यात यावी अशा सूचना प्रत्येक लसीकरण केंद्रास देण्यात आल्या असल्याची माहिती लसीकरण अधिकारी डॉ. सुर्यकांत देवकर यांनी दिली. लसीकरणाच्या ऑनलाईन बुकिंग करिता सकाळी ८ वाजता स्लॉट ओपन होणार आहे.