Corona Vaccination: पुणे शहरात शनिवारी १८६ केंद्रांवर प्रत्येकी २०० कोव्हिशिल्ड लस उपलब्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 09:51 PM2021-09-17T21:51:54+5:302021-09-17T21:52:25+5:30
ससूनसह महापालिकेच्या ११ दवखान्यात ५०० कोव्हॅक्सिन लस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
पुणे : पुणे महापालिकेच्या १८६ केंद्रांवर शनिवारी प्रत्येकी २०० लसीचे डोस वितरित करण्यात आले आहेत. तर ससूनसह महापालिकेच्या ११ दवखान्यात ५०० कोव्हॅक्सिन लस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
लसीच्या उपलब्ध साठ्यापैकी १८ वर्षांवरील नागरिकांना १५ टक्के लस ही ऑनलाईन बुकिंगव्दारे, तर १५ टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून पहिला डोस म्हणून मिळणार आहे. तर कोव्हिशिल्ड लसीच्या उर्वरित साठ्यापैकी ३५ टक्के लस ही ८४ दिवस पूर्ण झालेल्यांना ( २६ जून पूर्वी लस घेतलेल्यांना) ऑनलाईन बुकिंगव्दारे तर ३५ टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून दुसरा डोस म्हणून मिळणार आहे.
यानंतरही लस शिल्लक राहिल्यास ऑन स्पॉट नोंदणी करून दिव्यांग नागरिक व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना देण्यात याव्यात़ अशा सूचना प्रत्येक लसीकरण केंद्रास देण्यात आल्या असल्याची माहिती लसीकरण अधिकारी डॉ. सुर्यकांत देवकर यांनी दिली. लसीकरणाच्या ऑनलाईन बुकिंग करिता सकाळी ८ वाजता स्लॉट ओपन होणार आहे.