पुणे विभागातील बाधित शेतकऱ्यांना दोनशे कोटींची भरपाई

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2019 04:12 PM2019-02-09T16:12:12+5:302019-02-09T16:17:39+5:30

खरीप हंगात नुकसान झाल्याने पुणे विभागातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात २०६ कोटी ५९ लाख रुपयांची रक्कम भरपाईपोटी दिली जाणार आहे. 

200 crores compensation to affected farmers in Pune division | पुणे विभागातील बाधित शेतकऱ्यांना दोनशे कोटींची भरपाई

पुणे विभागातील बाधित शेतकऱ्यांना दोनशे कोटींची भरपाई

googlenewsNext
ठळक मुद्देशेतकऱ्यांना दोन ते तीन हप्त्यामध्ये मदतीचा निधी दिला जाणारमदतीची रक्कम संबंधितांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार

पुणे : पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगात नुकसान झाल्याने पुणे विभागातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात २०६ कोटी ५९ लाख रुपयांची रक्कम भरपाईपोटी दिली जाणार आहे. 
शासनाच्या महसूल व वन विभागाने २५ जानेवारी २०१९ रोजी घेतलेल्या निर्णयानुपसार ३३ टक्के अथवा त्यापेक्षा जास्त नुकसान झाले असल्यास, शेतकऱ्यांना दोन ते तीन हप्त्यामध्ये मदतीचा निधी दिला जाणार आहे. त्याचा पहिला हप्ता म्हणून ६ हजार ८०० रुपये प्रति हेक्टर या दराच्या ५० टक्के म्हणजेच  ३ हजार ४०० रुपये प्रति हेक्टर अथवा किमान एक हजार रुपये यापैकी अधिक रक्कम बाधित शेतककऱ्यांना पहिल्या टप्प्यात दिली जाईल. 
ही मदत २ हेक्टरच्या मर्यादेत आणि लागवड केलेल्या क्षेत्राच्या मर्यादेतच राहील. मदतीची रक्कम संबंधितांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे. ही रक्कम जमा झाल्यानंतर संबंधित बँकेला यातून कोणत्याही प्रकारची वसूली करता येणार नाही, असेही राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. 
ही रक्कम वाटप करण्यात आलेल्या लाभार्थ्यांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.त्यामुळे खरीप-२०१८च्या हंगामातील बाधित शेतककऱ्यांनी त्यांचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक व बँक खात्याशी संबंधीत सविस्तर माहिती सादर करावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले आहे.
---------
असा मिळेल निधी 

जिल्हा    रक्कम कोटीत
पुणे           ५३.२३ 
सातारा    २१.३६
सांगली    ३४.४०
सोलापूर    ९७.५९ 
एकुण        २०६.५९

Web Title: 200 crores compensation to affected farmers in Pune division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.