पालिकेला सीएसआरमधून २०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:10 AM2021-05-29T04:10:35+5:302021-05-29T04:10:35+5:30
दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरवरील रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली होती. या काळात शहरात खासगी आणि शासकीय रुग्णालयांना ऑक्सिजन ...
दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरवरील रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली होती. या काळात शहरात खासगी आणि शासकीय रुग्णालयांना ऑक्सिजन कमी पडत होता. ऑक्सिजन उपलब्ध करून घेण्यासाठी प्रशासकीय स्तरावर प्रयत्न करण्यात येत होते. या काळात मेडीकल लिक्विड ऑक्सिजन निर्मिती प्लांट टाकण्यास सुरुवात झाली. रुग्णांना अगदी सुरुवातीच्या काळात तसेच रुग्णालयातून उपचार घेऊन घरी आल्यानंतर ऑक्सिजन कॉन्सट्रेटर वापरण्याबाबत डॉक्टरांनी सल्ला देण्यास सुरुवात केली. विविध कंपन्यांनी त्यांच्या सामाजिक दायित्वामधून पालिकेला हे ऑक्सिजन कॉन्सट्रेटर भेट देण्यात आले आहेत.
-----
सीएसआरमधून प्राप्त : १८६
आमदार निधी : २०
-----
वितरण
बाणेर कोविड रुग्णालय - १०
सीओईपी जम्बो सेंटर - १२
दळवी रुग्णालय - ०५
डॉ. नायडू रुग्णालय - १५
कमला नेहरू रुग्णालय - २२
गणेश कला क्रीडा सेंटर - २५