पुणे शहरात दोन डोस घेऊनही २ हजार कोरोनाबाधित; मात्र एकही जण रुग्णालयात नाही दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2021 01:12 PM2021-08-22T13:12:58+5:302021-08-22T13:13:16+5:30

पुणे महापालिका हद्दीत सुमारे २० लाख ६५ हजार ४४० जणांनी पहिला डोस घेतला़ दुसरा डोस होइपर्यंत यापैकी ३ हजार ४८ जण कोरोनाबाधित झाले.

2,000 corona in Pune city despite taking two doses; However, no one was admitted to the hospital | पुणे शहरात दोन डोस घेऊनही २ हजार कोरोनाबाधित; मात्र एकही जण रुग्णालयात नाही दाखल

पुणे शहरात दोन डोस घेऊनही २ हजार कोरोनाबाधित; मात्र एकही जण रुग्णालयात नाही दाखल

Next
ठळक मुद्देविशेष म्हणजे पहिला डोस घेऊन बाधित झालेल्या नागरिकांनाही रूग्णालयातील उपचाराची गरज नाही

पुणे : शहरात लसीकरण मोहिम सुरू झाल्यानंतर आजपर्यंत ७ लाख ४२ हजार ९२३ जणांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. परंतु, यापैकी व ०.२७ टक्के नागरिक हे लसीचे दोन्ही डोस घेऊनही पंधरा दिवसानंतर कोरोनाबाधित झाल्याचे दिसून आले आहे. ही संख्या केवळ २ हजार ३६ इतकी आहे.

दरम्यान यापैकी एकाही रूग्णाला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्याची वेळ आली ना ऑक्सिजनची गरज पडल्याची दिलासादायक बाब या तपासणी पुढे आली आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून कोरोनाबाधित रूग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची तपासणी केली जाते. या तपासणीत दुसरा डोस घेतल्यानंतरही बाधित झालेल्या २ हजार ३६ रूग्णांची माहिती समोर आली आहे. 

पुणे महापालिका हद्दीत सुमारे २० लाख ६५ हजार ४४० जणांनी पहिला डोस घेतला़ दुसरा डोस होइपर्यंत यापैकी ३ हजार ४८ जण कोरोनाबाधित झाले.  ही टक्केवारी सुध्दा अत्यंत नगण्य असून, शहरात लसीचा पहिला डोस घेतल्यावर बाधित झालेल्यांची टक्केवारी ही ०.१४ टक्के आहे. विशेष म्हणजे पहिला डोस घेऊन बाधित झालेल्या नागरिकांनाही रूग्णालयातील उपचाराची गरज पडलेली नाही.  

लसीकरणानंतरचे ४१ मृत्यू पण अन्य आजाराने 

शहरात पहिला डोस घेतलेल्या २० लाख ६५ हजार ४४० जणांपैकी मृत्यू झालेल्यांची संख्या ही २१ आहे. तर दुसरा डोस घेतलेल्या ७ लाख ४२ हजार ९२३ जणांपैकी डोस घेतल्यानंतर १५ दिवसांच्या आत मृत्यू झालेल्यांची संख्या ही २० आहे. शहरात लसीच्या पहिल्या व दुसऱ्या डोस घेतल्यानंतर एकूण मृत्यूची संख्या ४१ इतकी आहे. परंतु, यातील बहुतांशी मृत पावलेल्या व्यक्ती या अन्य आजाराने पहिल्या पासूनच ग्रस्त होत्या. तसेच यापैकी ९० रूग्ण हे वयाच्या ६० वरील आहेत.  

Web Title: 2,000 corona in Pune city despite taking two doses; However, no one was admitted to the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.