पुरंदर तालुक्यात आढळले २०८ कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:08 AM2021-04-29T04:08:29+5:302021-04-29T04:08:29+5:30
बुधवारी पुरंदर तालुक्याच्या ग्रामीण भागातील १३३ रुग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत. शहरी भागातील सासवड, जेजुरी, नीरा येथील ५५ ...
बुधवारी पुरंदर तालुक्याच्या ग्रामीण भागातील १३३ रुग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत. शहरी भागातील सासवड, जेजुरी, नीरा येथील ५५ रुग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले.
सासवड येथील शासकीय लॅबमध्ये २४७ संशयित रुग्णांची अँटिजेन कोरोना चाचणी तपासण्यात आली. यापैकी ८९ रुग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले.
सासवड येथील ३०, हिवरे ५, खानवडी, पिसर्वे, सोनोरी, सुपे येथील प्रत्येकी ४, काळदरी, झेंडेवाडी, बेलसर, पागांरे येथील प्रत्येकी ३, खळद, दिवे , राजेवाडी, शिवरी, पानवडी, पिंपळे, कोडीत येथील प्रत्येकी २, वाघापूर, मुंजवडी, भिवरी, माळशिरस, पवारवाडी, गुरूळी, भोसलेवाडी, गराडे येथील प्रत्येकी १, तालुक्याबाहेरील ४ असे एकूण ८९ रुग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत.
जेजुरी येथील शासकीय लॅबमध्ये २०२ संशयित रुग्णांची अँटिजेन टेस्ट तपासणी करण्यात आली. यापैकी ९० रुग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले. जेजुरी येथील १२, बेलसर ९, कोळविहिरे ८, नायगाव ६, पिंपरी, मांडकी, नीरा, जेऊर येथील प्रत्येकी ४, नाझरे, मावडी पिंपरी, भोरवाडी येथील प्रत्येकी ३, भोसलेवाडी, पांडेश्वर, साकुर्डे, धालेवाडी, वाळुंज, थोपटेवाडी, गरूडवाडी, कोथळे येथील प्रत्येकी २, मावडी क.प, नावळी, खंड खैरेवाडी सासवड, खैरेवाडी, रानमळा, घाटेवाडी, पिसर्वे, वाल्हे येथील प्रत्येकी १, तालुक्याबाहेरील मुर्टी ३, वाकी २, असे एकूण ९० रुग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत.
जेजुरी येथील शासकीय लॅबमध्ये मंगळवार (दि.२७) ३१ संशयित रुग्णांचे आरटी - पीसीआर स्वॅब घेण्यात आले होते. यांचे प्रलंबित अहवाल बुधवारी प्राप्त झाले. यापैकी १९ रुग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले. जेजुरी येथील ६, नाझरे, नीरा, पांडेश्वर, गुळुंचे येथील प्रत्येकी २,
वाल्हे, शिवरी, कामठवाडी येथील प्रत्येकी १. तालुक्याबाहेरील मोराळवाडी येथील २ असे एकूण १९ रुग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत.
नीरा येथील प्राथमीक आरोग्य केंद्रात २८ संशयित व्यक्तींची अँटिजेन टेस्ट तपासणी करण्यात आली, पैकी १० रुग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले. नीरा येथील ८, वाल्हे १, तालुक्याबाहेरचे सोमेश्वर येथील १ असे तालुक्यातील ९ व तालुक्याबाहेरचे १ रुग्णाचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत.