बनावट डेबिट कार्डद्वारे २१ लाखांची फसवणूक प्रकरणात एकास कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 09:19 PM2018-03-29T21:19:13+5:302018-03-29T21:19:13+5:30

बनावट डेबिट कार्ड तयार करून २१ लाख ३४ हजार ३७५ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आणखी एकाला कोरेगाव पार्क पोलिसांनी अटक केली आहे. ७ आॅक्टोबर २०१७ रोजी ही घटना घडली. 

21 lakh rupees fraud by Fake Debit Card, one person police custody | बनावट डेबिट कार्डद्वारे २१ लाखांची फसवणूक प्रकरणात एकास कोठडी

बनावट डेबिट कार्डद्वारे २१ लाखांची फसवणूक प्रकरणात एकास कोठडी

Next
ठळक मुद्देयाप्रकरणी महंतकुमार कांचन तिवारी यांची फिर्याद

पुणे : बनावट डेबिट कार्ड तयार करून २१ लाख ३४ हजार ३७५ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आणखी एकाला कोरेगाव पार्क पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला २ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश दिला आहे. 
रोहीत सुरेश नायर (वय ३५, रा. वेस्ट पालघर) असे पोलीस कोठडी सुनाविण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी यापूर्वी करण मेहर सोनार (वय ३८), बॉबी उगोचुकवे, अर्ल अ‍ॅॅन्ड्युु अर्नेस्ट लॉरेन्स आणि फिरोज अहमद अब्दुलरसीद शेख (वय ३७, सर्व रा. ठाणे) यांना अटक करण्यात आली आहे. तर, सईद अब्दुल सय्यद, यासीर सय्यद, सज्जाद यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत महंतकुमार कांचन तिवारी (वय २७, रा. कोरेगाव पार्क) यांनी फिर्याद दिली आहे. ७ आॅक्टोबर २०१७ रोजी ही घटना घडली. 
आरोपीनी फिर्यादी याच्या खात्याचे बनावट डेबिट कार्ड बनलवे व त्यातून २ लाखांची रक्कम मुंबई येथील वेगवेगळ्या एटीएममधून काढली, असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी अटक आरोपींकडे तपास केला असता, त्यांनी फिर्यादी यांच्यासह इतरांची २१ लाख ३४ हजार ३७५ रुपयांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. गुन्ह्यातील रक्कम हस्तगत करण्यासाठी, इतर साथीदारांचा शोध घेण्यासाठी, इतर कोणची अशी फसवणूक केली आहे का? याचा शोध घेण्यासाठी त्याला पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकीलांनी केली. त्यानूसार न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनाविली. 

Web Title: 21 lakh rupees fraud by Fake Debit Card, one person police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.