देवदर्शनाचा मोफत प्रवास नडला २१ जण जखमी; खेड तालुक्यातील एका भावी आमदाराची राजकीय वारी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2024 11:14 PM2024-07-01T23:14:00+5:302024-07-02T00:04:43+5:30
सोमवारी (दि १) तालुक्याच्या आढे गावा जवळ पहाटे हा अपघात झाला.
राजेंद्र मांजरे -
राजगुरुनगर : मोफत पंढरपूर यात्रा करून परतलेल्या बसला खेड तालुक्यात अपघात होऊन २१ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. खेड तालुक्यात विधानसभा निवडणुक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवाराच्या गाडीला हा अपघात झाला आहे. अपघातातील २१ जणांवर आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. सोमवारी (दि १) तालुक्याच्या आढे गावा जवळ पहाटे हा अपघात झाला.
पंढरपूर दर्शन करून यात्रेकरूंना गावोगावी सुखरूप परत घरी सोडण्यासाठी बस आली असताना तांबडे वाडी वरुन निघाली. आढे गावा जवळ आल्यावर रस्त्याच्या कडेला चिखलात घसरून खड्यात चाक उतरल्याने बस पलटली. त्यातील वीस पंचवीस भाविक आतमध्ये सीटवर तसेच एकमेकांवर आदळून जखमी झाले.
खेड तालुक्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे.काही महिन्यात होणाऱ्या निवडणुकी पुर्वी मतदारांना आकर्षित करण्यासाठी इच्छुकांकडून विविध प्रकारची प्रलोभने दाखवण्याची स्पर्धा सुरू झाली आहे.त्याचाच एक भाग म्हणून आषाढी वारी सुरू असताना पंढरपूर दर्शनाचा लाभ मतदारांना देण्याचा आटापिटा इच्छुक उमेदवार व त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे.