कुकडी प्रकल्पात २१ टक्के साठा, पाणीसाठा खालावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 02:43 AM2018-05-10T02:43:07+5:302018-05-10T02:43:07+5:30

कुकडी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या पाचही धरणांच्या पाणीसाठ्यात सध्या झपाट्याने घट झाली आहे. डिंभे धरण वगळता सर्वच धरणांतील पाणीसाठ्यांनी तळ गाठले असून आजमितीस या प्रकल्पात केवळ ६.५३३ टीएमसी म्हणजेच २१.३९ टक्केएवढा पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी आजच्या तारखेला प्रकल्पात २.४६५ टीएमसी म्हणजे केवळ ८.०७ टक्केएवढा अत्यल्प पाणीसाठा शिल्लक होता.

21 percent storage of kukadi, water supply will be reduced | कुकडी प्रकल्पात २१ टक्के साठा, पाणीसाठा खालावला

कुकडी प्रकल्पात २१ टक्के साठा, पाणीसाठा खालावला

googlenewsNext

डिंभे - कुकडी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या पाचही धरणांच्या पाणीसाठ्यात सध्या झपाट्याने घट झाली आहे. डिंभे धरण वगळता सर्वच धरणांतील पाणीसाठ्यांनी तळ गाठले असून आजमितीस या प्रकल्पात केवळ ६.५३३ टीएमसी म्हणजेच २१.३९ टक्केएवढा पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी आजच्या तारखेला प्रकल्पात २.४६५ टीएमसी म्हणजे केवळ ८.०७ टक्केएवढा अत्यल्प पाणीसाठा शिल्लक होता. त्या तुलनेत यंदाचा पाणीसाठा हा दुपटीने जास्त आहे, असे असले तरी उन्हाळी आवर्तनामुळे हा पाणीसाठा झपाट्याने घटणार आहे.
जुन्नर तालुक्यातील येडगाव, माणिकडोह, वडज, पिंपळगाव, तर आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरण या पाच धरणांचा मिळून कुकडी प्रकल्प तयार होतो. या प्रकल्पाच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, शिरूर व अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, तसेच सोलापूर जिल्ह्यातील करमाळा अशा एकूण सात तालुक्यांमधील सुमारे १,५६,२७८ एवढे मोठे क्षेत्र कालव्यांद्वारे सिंचनाखाली आले आहे. सर्वत्र बागायती पिके घेतली जाऊ लागल्याने उन्हाची तीव्रता वाढू लागताच सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात प्रकल्पातून पाणी सोडण्याची मागणी शेतकºयांकडून होऊ लागली आहे. मात्र कुकडी प्रकल्पाची यंदाची स्थिती मागील वर्षाच्या तुलनेत बरी असली तरी अजून उन्हाळी आवर्तन सोडणे बाकी आहे.
खरिपासाठी एक, तर रब्बीसाठी दोन आवर्तने सोडली आहेत. उन्हाळी आवर्तन सुरू होताच प्रकल्पातील पाणीसाठा झपाट्याने खाली जाणार आहे. या प्रकल्पातील डिंभे धरणातच सध्या सर्वाधिक पाणीसाठा असला तरी या धरणाच्या उजव्या कालव्यातून १८० क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत आहे. प्रकल्पात येणाºया पाच धरणांपैकी येडगाव धरणात आजमितीस ६०.४० टक्के पाणीसाठा शिल्लक दिसत आहे. याचे कारण उन्हाळी आवर्तनासाठी या धरणात पाणीसाठा केला जात आहे. मात्र या धरणाचा उपयुक्त पाणीसाठा कमी आहे.
यंदा या प्रकल्पांतर्गत येणाºया धरणांतून रब्बीसाठी २, खरिपासाठी दोन रोटेशन पूर्ण झाली आहेत. यामुळे आज जरी कुकडी प्रकल्पात २१.३९ टक्केएवढा पाणीसाठा दिसत असला तरी वाढत्या उन्हाची तीव्रता व पाण्याच्या मागणीमुळे प्रकल्पातून उन्हाळी आवर्तन सोडण्याची गरज लागणार आहे. डिंभेच्या पाण्यावरच सगळ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. सध्या या धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात येत असल्याने या धरणातील पाणीसाठाही झपाट्याने कमी होत आहे.

आदिवासी गावांची वणवण सुरू होईल

प्रकल्पातून उन्हाळी रोटेशन सुरू झाल्यास पाणलोटाच्या आतील आदिवासी गावांना पाण्याच्या या पळवापळवीचा फटका बसणार आहे. सध्या जरी थोड्याफार प्रमाणात पाणीसाठा शिल्लक असला तरी मे महिन्याच्या अखेरीस या भागात असणाºया पाणी योजना अडचणीत येणार असल्याने पाणलोट क्षेत्रातील आदिवासी गावांना यंदाही कमी-अधिक प्रमाणात पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागण्याची चिन्हे आहेत.

येडगाव
साठवण क्षमता ३.३ टीएमसी एवढी असून सध्या या धरणात केवळ १.६९१ टीएमसी एवढा पाणीसाठा आहे.

माणिकडोह
साठवण क्षमता १०.८८ टीएमसी एवढी आहे. सध्या या धरणात ०.९३० टीएमसी म्हनजेच ९.१४ टक्केएवढा पाणीसाठा शिल्लक आहे.

वडज
साठवण क्षमता १.२७१ टीएमसी एवढी असून सध्या या धरणात ०.२०३ टीएमसी म्हणजेच १७.४४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

पिंपळगाव जोगा
साठवण क्षमता ७.६८७ टीएमसी एवढी आसून आजतागायत या धरणात ०.५५६ टीएमसी म्हणजेच १४.२८ टक्केएवढा पाणीसाठा शिल्लक आहे.

डिंभे
१३.५०० एवढी साठवण क्षमता असून आजमितीस या धरणात ३.१५२ टीएमसी म्हणजेच २५.२२ टक्केएवढा पाणीसाठा शिल्लक आहे.

५ धरणे मिळून कुकडी प्रकल्पात ६.५३३ टीएमसी म्हणजेच २१.३९ टक्के एवढा एकूण साठा शिल्लक आहे.

Web Title: 21 percent storage of kukadi, water supply will be reduced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.