अाई वडिलांना एवढंच कळालं की मी साहेब झालाे...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 04:29 PM2018-05-31T16:29:56+5:302018-05-31T19:40:21+5:30
पालघर जिल्ह्यातील अादिवासी भागात राहणारा कल्पेश जाधव हा एमपीएससी परीक्षा पास झाला असून अाता ताे राज्य शासनाच्या काैशल्य विकास विभागात उपसंचालक म्हणून रुजु हाेणार अाहे.
पुणे : दाेन वर्षापूर्वी मी क्लास वन अाॅफिसर हाेईल असं वाटलं नव्हतं. मनात जिद्द हाेती, स्वतःला सिद्ध करायचं हाेतं. त्यामुळे अाज एमपीएससी परीक्षा पास झाल्याचा अत्यंत अानंद अाहे. माझे अाई-वडिल निरक्षर अाहेत, ते मजुरी करतात. त्यांना स्पर्धा परीक्षांबाबत काही माहित नाही. त्यांना मी सकाळी फाेन करुन मी एमपीएससी पास झाल्याचं सांगितल्यानतंर त्यांना अापला मुलगा काेणीतरी माेठा साहेब झाला अाहे इतकंच कळालं. एमपीएससीची परीक्षा पास झालेला कल्पेश जाधव त्याची कहाणी सांगत हाेता. कल्पेशची कहाणी सर्वांसाठीच प्रेरणादायी अाहे. ताे अवघ्या 21 व्या वर्षी क्लास वन अाॅफिसर झाला अाहे.
पालघर जिल्ह्यातल्या एका अादिवासी भागात कल्पेशचे गाव अाहे. घरची परिस्थिती तशी बेताचीच. अाई-वडिल दाेघेही निरक्षर. माेलमजुरी करुन अापला संसार चालवतात. कल्पेशचा माेठा भाऊ काॅन्स्टेबल अाहे. कल्पेश एमपीएससी पास झाल्याचा त्याला खूप अानंद झाला. अाई-वडिल निरक्षर असल्यामुळे अापला मुलगा एमपीएससी पास झाला म्हणजे नेमकं ताे अाता काय काम करणार हे त्याच्या अाई वडिलांना माहित नाही. अापला मुलगा साहेब झाला हेच ते अाता गावात सांगतायेत. कल्पेशने कल्याण मधल्या बिर्ला महाविद्यालयातून बीएस्सी पूर्ण केले अाहे. महाविद्यालयात असताना त्याला एमपीएससी बद्दल माहिती मिळाली. तेव्हापासूनच त्याने तयारी सुरु केली हाेती. परिस्थीती तशी बेताचीच असल्याने काेणताही क्लास लावणे किंवा काेणाचे मार्गदर्शन घेणे त्याला शक्य नव्हते. महाविद्यालय सांभाळून ताे दिवसातले सात ते अाठ तास अभ्यास करत हाेता. या कष्टाचे अाता चिझ झाल्याचे कल्पेश म्हणताे. एमपीएससीची मुख्य परीक्षा दिल्यानंतर कल्पेश पुण्यात अाला. पुण्यात त्याने मुलाखतीचे मार्गदर्शन घेतले. कल्पेश अाता राज्य शासनाच्या काैशल्य विकास विभागात उपसंचालक म्हणून रुजु हाेत अाहे.
अापल्या यशाबाबत बाेलताना कल्पेश म्हणाला, दाेन वर्षापूर्वी मी क्लास वन अधिकारी हाेईल असे वाटले नव्हते. माझे स्वप्न अाज सत्यात उतरले अाहे. अापल्या कष्टाचे चिझ झाल्याचा खूप अानंद अाहे. माझ्या अाई-वडिलांना तसेच भावाला मी अाज सकाळी ही अानंदाची बातमी कळवली. त्यांनाही खूप अानंद झाला अाहे. अामचे गाव अादिवासी भागात अाहे. अामच्या गावात पदवी शिक्षण पूर्ण केलला मी दुसरा-तिसराच असेल. त्यामुळे अामच्या गावातही अानंदाचे वातावरण अाहे.