विभागात २१० टँकरद्वारे पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2016 01:33 AM2016-03-12T01:33:22+5:302016-03-12T01:33:22+5:30
विभागात दुष्काळाच्या झळा तीव्र होत असून, तब्बल ४ लाख ६८ हजार नागरिकांना २१० टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यात सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात गंभीर परिस्थिती असून
पुणे : विभागात दुष्काळाच्या झळा तीव्र होत असून, तब्बल ४ लाख ६८ हजार नागरिकांना २१० टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यात सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात गंभीर परिस्थिती असून, येथे तब्बल ७३ टँकर सुरू आहेत. गत वर्षी या वेळी विभागात केवळ १५ टँकर सुरू होते. विभागात आजअखेर २१० टँकरद्वारे तब्बल १८१ मोठी गावे आणि तब्बल १ हजार ३३० वाड्यावस्त्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये सर्वांधिक १०१ टँकर सांगली जिल्ह्यात सुरु असून, पुणे ६४, सातारा ३६ आणि सोलापूर जिल्ह्यात ९ टँकर सुरु आहेत. सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे सर्व स्त्रोत अटल्यामुळे काही गावांसाठी शासनाने खासगी विहिरी ताब्यात घेतल्या आहेत. विभागात सुमारे २०२ खासगी विहिरीचे अधिग्रहण केले आहे. ४ लाख ६८ हजार ५०० लोक बाधित झाले आहेत.
आठ दिवसांतच टँकरची संख्या १६८ वरून २१० वर