खडकवासल्यातून २१ हजार क्युसेक्सने विसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2019 09:36 AM2019-08-03T09:36:47+5:302019-08-03T09:40:32+5:30

शुक्रवारी रात्री ८ वाजता खडकवासला धरणातून मुठा नदीत तब्बल २० हजार ६९१ क्युसेक्सनेविसर्ग सोडण्यास सुरुवात केली.

21,000 cusecs water left from the khadakwasla dam | खडकवासल्यातून २१ हजार क्युसेक्सने विसर्ग

खडकवासल्यातून २१ हजार क्युसेक्सने विसर्ग

Next
ठळक मुद्देनदीकाठच्या भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा :महापालिकेची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज; मुठा खोऱ्यांमध्ये जोरदार पाऊसपानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये धुवांधार पाऊस

पुणे : सध्या मुठा खोऱ्यामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. खडकवासला धरणासह पानशेत धरणदेखील शंभर टक्के भरले आहे. यामुळेच खडकवासला धरणातून शुक्रवारी रात्री आठ वाजता २० हजार ६९१ क्युसेक्सने मुठा नदीत पाण्याचा विसर्ग सोडला आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्यास रात्री विसर्गामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे महापालिकेच्या वतीने नदीकाठच्या भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 
गेल्या आठ दिवसांपासून मुठा खोऱ्यामध्ये प्रामुख्याने पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये धुवांधार पाऊस सुरू आहे. यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. पानशेत धरणातूनदेखील पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. शुक्रवारी रात्री ८ वाजता खडकवासला धरणातून मुठा नदीत तब्बल २० हजार ६९१ क्युसेक्सनेविसर्ग सोडण्यास सुरुवात केली. यामुळे शहराच्या कोणत्याही भागात पाणी शिरणार नसले तरी रात्री विसर्ग वाढविल्यास सिंहगड रोड, गरवारे कॉलेजजवळील खिलारे वस्ती, ओकारेश्वर परिसर, येरवडा, ढोले-पाटील रोड परिसरामध्ये प्रामुख्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे. खडकवासला धरणातून २१ हजार क्सुसेक्सने पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत असला तरी अद्याप हा 
धोक्याचा विसर्ग नसून, नागरिकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने महापालिकेच्या सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश दिल्याचे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन प्रमुख गणेश सोनुने यांनी सांगितले.
 .................

भिडे पूल पाण्याखाली जातो - १८०००
गरवारे कॉलेजजवळील खिलारे वस्तीत पाणी शिरते - २८०००
कामगार पुतळा, शिवाजीनगर -३००००
शितळादेवी मंदिर (डेक्कन) पाण्याखाली जाते- ३३०००
पुलाची वाडी, डेक्कन जिमखाना - ३५०००
तोफखाना, शिवाजीनगर, पीएमटी टर्मिनल्स, डेक्कन- ४००००
शिवणे नदी लगतचा भाग- ५००००
पुणे मनपाजवळील नवीन पूल-५४०००
पाटील इस्टेट झोपडपट्टीमध्ये पाणी शिरते- ६०००० 

Web Title: 21,000 cusecs water left from the khadakwasla dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.