पुरंदर तालुक्यात २१२ कोरोनाबाधित, पाच जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:12 AM2021-05-07T04:12:33+5:302021-05-07T04:12:33+5:30
सासवड येथील शासकीय लॅबमध्ये २३८ संशयित रुग्णांची अँटिजन टेस्ट करण्यात आली. सासवड शहरांमधील ४६ तर, ग्रामीण भागातील ४२ असे ...
सासवड येथील शासकीय लॅबमध्ये २३८ संशयित रुग्णांची अँटिजन टेस्ट करण्यात आली. सासवड शहरांमधील ४६ तर, ग्रामीण भागातील ४२ असे ८८ रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आले. सासवड ४६, पिसर्वे ५, बोपगाव ४, हिवरे, झेंडेवाडी, खळद, काळेवाडी, गुरूळी येथील प्रत्येकी ३, एखतपूर, दिवे, आंबळे, भिवरी येथील प्रत्येकी २, सोनोरी, भिवडी, चांबळी, सुपे, कुंभारवळण, निळूंज, पिंपळे, पवारवाडी, शिवरी येथील प्रत्येकी १ असे एकूण ८८ रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
जेजुरी येथील शासकीय लॅबमध्ये ७७ संशयित रुग्णांची अँटिजन टेस्ट करण्यात आली. यापैकी ३९ रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. जेजुरी येथील १२, निरा ५, बेलसर ३, भोसलेवाडी, निळूंज, पिंपरे खुर्द प्रत्येकी २, भोंडवेवाडी, भोंगळेमळा, जेऊर, खोमणेमळा, नायगाव, नाझरे क.प, पिलाणेवाडी, पिंपरी, पिसर्वे, शिवरी, थोपटेवाडी येथील प्रत्येकी १, तालुक्याबाहेरील वढाणे येथील २ असे एकूण ३९ रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
जेजुरी येथील शासकीय लॅबमध्ये गुरुवार (दि.६) ७२ संशयित रुग्णांचे आरटी- पीसीआर स्वॅब घेण्यात आले होते. यापैकी १३ रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. जेजुरी, पिसर्वे ४, बेलसर, जेऊर, कोळविहीरे, मावडी, नाझरे येथील प्रत्येकी १ असे ८ रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
ग्रामीण कार्यक्षेत्रात माझे कुटुंब-माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत बेलसर, वाल्हे, परिंचे, माळशिरस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात १९६ संशयित रुग्णांची अँटिजन टेस्ट करण्यात आली. यापैकी ६४ रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले.
बेलसर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात २९ संशयित रुग्णांची अँटीजन टेस्ट करण्यात आली. यापैकी ९ रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले.
वाल्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ६० संशयित रुग्णांची अँटीजन टेस्ट करण्यात आली. यापैकी २७ रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. निरा ६, वाल्हे, वागदरवाडी, दौंडज येथील प्रत्येकी ४, पिंपरे, जेजुरी २, राख, हरणी , कर्नलवाडी, पिसुर्टी प्रत्येकी १
परिंचे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ४६ संशयित रुग्णांची अँटिजन टेस्ट करण्यात आली. यापैकी १२ रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले.
हरणी ५, परिंचे ४, माहूर, हरगुडे, पुणे १
माळशिरस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ६१ संशयित रुग्णांची अँटिजन टेस्ट करण्यात आली. यापैकी १६ रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. आंबळे येथील १६ रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले.
सासवड येथील खासगी लॅबमध्ये घेण्यात आलेल्या आर.टी. पी.सी.आर सॅब मधील ३ रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. राजूरी, हिवरे, सासवड येथील प्रत्येकी १.
लोणंद येथील खासगी लॅबमधील अँटिजन टेस्टमधील नीरा येथील ५ रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.