२२ कोटींचा पुरवणी टंचाई आराखडा अमान्य
By admin | Published: May 30, 2017 02:17 AM2017-05-30T02:17:32+5:302017-05-30T02:17:32+5:30
जिल्ह्यातील टंचाई निवारण करण्यासाठी मूळ आराखडा २१.२० कोटी रुपयांचा तयार करण्यात आला होता. त्यानंतर त्यात वाढ करून
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यातील टंचाई निवारण करण्यासाठी मूळ आराखडा २१.२० कोटी रुपयांचा तयार करण्यात आला होता. त्यानंतर त्यात वाढ करून २२.६० कोटी रुपयांचा पुरवणी आराखडा तयार करण्यात आला होता. मात्र हा आराखडादेखील जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी अमान्य केला आहे़
जिल्हा परिषदेने पुरवणी आराखड्यामध्ये केलेल्या मागण्या या अवास्तव आहेत. त्यामुळे तो अमान्य करण्यात आला आहे़ तरीदेखील हा आराखडा नव्याने दोनदा सादर केला गेला. त्यातही त्रुटी राहिल्याने तोदेखील अमान्य करण्यात आला आहे. आता तिसऱ्यांदा तो १५ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे़ त्यातच सध्या पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने तो मान्य होण्याची शक्यता कमी आहे़
२१ कोटी २० लाख रुपयांचा पहिला आराखडा तयार करण्यात आला होता. त्यातील सध्या जिल्ह्यात १० कोटी ५८ लाख रुपयांची कामे करण्यात आली आहेत.