सिलिंडर स्फोटात २२ झोपड्या खाक
By admin | Published: April 13, 2016 03:32 AM2016-04-13T03:32:00+5:302016-04-13T03:32:00+5:30
बालेवाडी स्टेडियमच्या मागे म्हातोबानगरमधील झोपडपट्टीला लागलेल्या आगीत २२ झोपड्या जळून खाक झाल्या. या वेळी ७ सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग भडकली. अग्निशामक
पुणे : बालेवाडी स्टेडियमच्या मागे म्हातोबानगरमधील झोपडपट्टीला लागलेल्या आगीत २२ झोपड्या जळून खाक झाल्या. या वेळी ७ सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग भडकली. अग्निशामक दलाच्या जवानांनी एका तासात आग आटोक्यात आणली. मगंळवारी सकाळी ११च्या सुमारास ही घटना घडली.
संजय बालवडकर यांच्या मोकळ्या जागेत कामगार तसेच मजुरांच्या ५० झोपड्या आहेत. एका झोपडीत सकाळी आग लागली. आगीत सिलिंडरचा स्फोट झाल्याने भडका उडून शेजारील २२ झोपड्या जळाल्या. इतर झोपड्यांतील ७ सिलिंडरचा स्फोट झाल्याने आगीने भीषण रूप धारण केले. कोथरूड, पाषाण आणि सेंट्रल फायर ब्रिगेडच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.
कोथरूड अग्निशामक दलाचे केंद्रप्रमुख गजानन पाथरुडकर यांनी सांगितले, की झोपड्यांत असणारे स्टील तसेच इतर साहित्य वितळले आहे. महावितरणकडून वीजपुरवठा तत्काळ खंडित केल्याने अनर्थ टळला. नेमकी आग कशामुळे लागली, याचे कारण समजू शकले नाही. मात्र, एका झोपडीत आग लागून तेथील सिलिंडरचा स्फोट झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. कोथरूड, पाषाण व सेंट्रल फायर ब्रिगेडच्या तीन गाड्यांच्या मदतीने १५ जवानांनी ही आग आटोक्यात आणली.