इंदापूरसह 22 गावांना पाणी?

By admin | Published: November 13, 2014 11:56 PM2014-11-13T23:56:17+5:302014-11-13T23:56:17+5:30

फक्त 2क्क् ते 3क्क् क्युसेक्स पाणी इंदापूर तालुक्यातील सणसर येथून 22 गावांना मिळू शकते, असे वक्तव्य खडकवासला प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत केले.

22 villages with Indapur water? | इंदापूरसह 22 गावांना पाणी?

इंदापूरसह 22 गावांना पाणी?

Next
पुणो  : खडकवासला प्रकल्पातील 13क्क् क्युसेक्स पाणी सिंचनासाठी कालव्याव्दारे सोडले, की 172 किलोमीटर्पयत पोहोचेर्पयत त्यातील फक्त 2क्क् ते 3क्क् क्युसेक्स पाणी इंदापूर तालुक्यातील सणसर येथून 22 गावांना मिळू शकते, असे वक्तव्य खडकवासला प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत केले. त्यामुळे संतप्त सदस्यांच्या रोषाला या अधिका:यांना सामोरे जावे लागले.चासकमानचे पाणी पैसे घेतल्यानंतरच पाझर तलावांसाठी सोडले जात असल्याचा, मते न दिल्याने पाणी सोडले जात नसल्याचा, आरोपही झाल्याने सभेचे वातावरण काही वेळ गंभीर बनले. 
 खडकवासला प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता बी.बी.लोहार यांच्यासह अन्य प्रकल्पांच्या अधिका:यांना या सभेसाठी निमंत्रित केले होते.पाणी टंचाईचा विषय सुरू झाल्यानंतर सणसर येथे कालव्याचे पाणी मिळत नाही, असे श्रीमंत ढोले यांनी सांगितले. लोहार यांनी त्यावर खुलासा करताना इंदापूरसाठी 3.9क् अब्ज घनफूट(टीएमसी)पाणी 15 ऑक्टोबर रोजी राखीव केले आहे.त्यापैकी 1टीएमसी पाणी सणसर उपकालव्याव्दारा 22 गावांसाठी सोडले जाते. पैसे घेतल्यानंतर चासकमान प्रकल्पाचे अधिकारी पाझर तलावांसाठी सोडतात, असा आरोप दादा कोळपे यांनी केला.
 
4श्रीमंत ढोले यांनी सणसरसाठी सोडल्या जाणा:या पाण्यापैकी बरेचसे पाणी गायब कोठे होते?ते विकले जाते का?असा प्रश्न केला. अखेर अध्यक्ष दत्तात्रय भरणो यांनी हस्तक्षेप करीत माहिती बांदल यांना द्यावी, अशा सूचना लोहार यांना दिल्या.  माऊली खंडागळे यांनी जुन्नर तालुक्यासह जिल्हय़ात 2क्क् फूट खोलीवर पाणी शिल्लक नसल्याने अधिक खोलीर्पयत जाण्यासाठी परवानगी घेतली जावी, अशी मागणी केली. आशा बुचके यांनी पाणी न लागलेल्या ¨वधन विहिरींवर खर्च झाल्याचे नमूद केले.

 

Web Title: 22 villages with Indapur water?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.