Pune Corona News: पुणे शहरात बुधवारी २२५ जणांची कोरोनावर मात; तर १९९ नवे रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2021 20:33 IST2021-09-15T20:33:21+5:302021-09-15T20:33:29+5:30
विविध तपासणी केंद्रांवर ७ हजार ९७३ संशयितांची तपासणी करण्यात आली

Pune Corona News: पुणे शहरात बुधवारी २२५ जणांची कोरोनावर मात; तर १९९ नवे रुग्ण
पुणे : शहरात बुधवारी १९९ कोरोनाबाधित आढळून आले असून, २२५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज विविध तपासणी केंद्रांवर ७ हजार ९७३ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी २.४९ टक्के इतकी आढळून आली आहे.
शहरातील सक्रिय रूग्ण संख्या आजमितीला १ हजार ८५८ सक्रिय रुग्ण आहेत. तर दिवसभरात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ५ जण हे पुण्याबाहेरील आहे. शहरातील आजचा मृत्यूदर हा १.८० टक्के इतका आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही १८८ इतकी असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २२५ इतकी आहे. शहरात आतापर्यंत ३२ लाख ५२ हजार ७१७ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ९८ हजार ६६७ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ८७ हजार ८२३ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ९८६ जणांचा मृत्यू झाला आहे.