गुरुवारी २२९ कोरोनाबाधितांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:07 AM2021-01-01T04:07:53+5:302021-01-01T04:07:53+5:30
पुणे : शहरात गुरूवारी २२९ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, ४२१ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत़ आज दिवसभरात ३ हजार ८१९ ...
पुणे : शहरात गुरूवारी २२९ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, ४२१ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत़ आज दिवसभरात ३ हजार ८१९ संशयितांची तपासणी केली़ तपासणीच्या तुलनेत आजच्या पॉझिटिव्हची टक्केवारी ही ५़९ टक्के इतकी आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी चारपर्यंत शहरातील विविध रूग्णांलयांमध्ये २४६ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू असून, यापैकी १५२ जण व्हेंटिलेटरवर आहेत़ तर शहरातील ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ६३४ इतकी आहे़
शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ३ हजार ३१७ इतकी आहेत़ आज दिवसभरात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ३ जण पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील एकूण मृत्यूची संख्या ही ४ हजार ६३१ इतकी झाली आहे़
शहरात आजपर्यंत ९ लाख १७ हजार १९५ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. यापैकी १ लाख ७८ हजार ७६९ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ यापैकी १ लाख ७० हजार ८२१ जण कोरोनामुक्त झाले आहेत़