कोंबिंग ऑपरेशनमध्ये २३ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:14 AM2021-08-15T04:14:16+5:302021-08-15T04:14:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी शुक्रवारी रात्री पुन्हा एकदा कोंबिंग ऑपरेशन राबवून गुन्हेगारांची झाडाझडती घेतली. ...

23 arrested in combing operation | कोंबिंग ऑपरेशनमध्ये २३ जणांना अटक

कोंबिंग ऑपरेशनमध्ये २३ जणांना अटक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी शुक्रवारी रात्री पुन्हा एकदा कोंबिंग ऑपरेशन राबवून गुन्हेगारांची झाडाझडती घेतली. यामध्ये पोलिसांच्या रेकॉर्डवरील अडीच हजार सराईत तपासल्यानंतर ८२९ सराईत पोलिसांना मिळून आले. यामध्ये शस्त्र बाळगणाऱ्या २३ आरोपींना अटक करून १७ कोयते, तीन तलवारी, दोन चाकू जप्त करण्यात आले आहेत.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरात कोंबिंग ऑपरेशन राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच, शहरातील लॉजेस, हॉटेल, रेल्वे स्टेशन, बसस्थानके, संशयित व्यक्तीची कसून तपासणीचे आदेश दिले होते. त्यानुसार सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे व झोनचे सर्व उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली पथके तयार करून शुक्रवारी रात्री दहा ते मध्यरात्री एकपर्यंत सराईतांची झाडाझडती घेण्यात आली. ज्यांच्याकडे बेकायदा शस्त्र आढळून आली अशा २३ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. विविध गुन्ह्यात फरार असलेल्या ६ आरोपींना पकडण्यात यश आले आहे. या करावाईत २८७ आरोपींच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. शहरातली विविध पथकांनी ३९७ लॉजेस, हॉटेलची तपासणी केली आहे.

गुन्हे शाखेच्या युनिट तीनने राबविलेल्या मोहिमेत दरोड्याच्या तयारीतील पाच आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून ३ पिस्तूल, ५ काडतुसे व इतर ऐवज असा ३ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांनी अचानक केलेल्या तपासणीत तडीपारीचा भंग करून शहरात पुन्हा आलेल्या १३ तडीपारांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी १० तडीपार गुन्हे शाखा व ३ तडीपार स्थानिक पोलिसांनी पकडले आहेत.

Web Title: 23 arrested in combing operation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.