पालिकेची २३ कोटींची वसुली

By admin | Published: March 27, 2017 02:46 AM2017-03-27T02:46:20+5:302017-03-27T02:46:20+5:30

बारामती नगरपालिकेने कराच्या वसूलीची जोरदार मोहीम उघडल्यामुळे आज अखेर मालमत्ता कराची

23 crore of the recovery of the corporation | पालिकेची २३ कोटींची वसुली

पालिकेची २३ कोटींची वसुली

Next

बारामती : बारामती नगरपालिकेने कराच्या वसूलीची जोरदार मोहीम उघडल्यामुळे आज अखेर मालमत्ता कराची ८.५० टक्के तर सर्व एकत्रीत कराची १४.७० कोटी वसूली करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्याधिकारी निलेश देशमुख यांनी दिली. कर वसूलीसाठी २ हजार मिळकरधारकांना जप्ती नोटीस काढल्या आहेत. तर आणखी १ हजार मिळकतधारकांना नोटीसा बजावण्यात येणार आहे. एकत्रीत कराची वसूली जवळपास २३ कोटी २० लाख इतकी झाली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जून अखेर पर्यंत करवसूलीची मोहिती राबविण्यात येणार आहे, असे देशमुख यांनी सांगितले. सरकारी कार्यालयांचे कर थकले आहेत, त्यांच्यावर देखील कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. राज्य सरकार कर्ज मुक्तीची घोषणा करेल, या आशेवर शेतकरी आहे. त्यामुळे अपेक्षीत कर्ज वसूली होत नाही. त्याच बरोबर बाजारात चलन फिरत नसल्याने व्यापारी वर्ग, व्यावसायीक देखील अडचणीत आहेत. (वार्ताहर)

करवसुलीसाठी कर्मचारी तणावात..
करवसूलीच्या मोहीमेत वेगवेगळ्या मोबाईल कंपन्यांचे ६ टॉवर सील करण्यात आले. त्याच बरोबर, गाळे, मिळकतधारकांची स्थावर मालमत्तेला अटकाव करण्यात आला, अशी माहिती देशमुख यांनी दिली. राज्य सरकारने च अनुदानासाठी किमान ९० ट्क्के कराची वसूली झाली पाहीजे, अशी सूचना केली आहे. त्यामुळे कर वसूलीची मोहीम सकाळी ८ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत राबविली जात आहे. जमा झालेली कराची रक्कम त्याच दिवशी नगरपालिकेच्या तिजोरीत जमा होत आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशीचे नियोजन केले जात आहे. या पार्श्वभूमीवर मिळकतधारकांमध्ये देखील धास्तीचे वातावरण आहे.

मंदीचा परिणाम
नोटाबंदीनंतर बाजारात आर्थिक मंदीचे वातावरण आहे. त्याच परिणाम कर वसूलीवर होत आहे. मात्र, मिळकतींना नोटीसा बजावल्यामुळे कर वसूली वाढली आहे. भाजपा, बारामती विकास आघाडीच्या नगरसेवक आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करून कराच्या व्याजात आणि दंडात सवलत द्यावी, अशी मागणी केली होती.

मोबाईल कंपन्यांचे टॉवर सील..
जिल्हाधिकाऱ्यांनी १ मे रोजी नगरपालिका थकीत कराच्या वसूलीतून मुक्त करा, असे आदेश दिले आहेत. त्यानुसार बारामती मध्ये रिलायन्स, बीएसएनएल, टेलीनॉर, एअरसेल आदी कंपन्यांचे टॉवर सील करण्यात आल्यानंतर थकीत कराचे धनादेश प्राप्त होण्यास सुरूवात झाली. त्याच बरोबर शहरातील एका इंग्रजी माध्यम शाळेने ४ लाख रूपये तातडीने भरले. ३१ मार्चपूर्वी जास्तीत जास्त मिळकतधारकांनी कर भरण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी नमूद केले.

Web Title: 23 crore of the recovery of the corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.