आठ वर्षापासून 23 जण नोकरीच्या प्रतीक्षेत
By admin | Published: October 29, 2014 12:26 AM2014-10-29T00:26:19+5:302014-10-29T00:26:19+5:30
पुणो कॅन्टोन्मेंट बोर्डातील 23 सफाई कर्मचारी गेल्या आठ वर्षापासून नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यात येणार होती.
Next
पुणो : पुणो कॅन्टोन्मेंट बोर्डातील 23 सफाई कर्मचारी गेल्या आठ वर्षापासून नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यात येणार होती. मात्र, प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे 23 जणांपैकी अनेकांचे वय निघून गेल्यानंतरही त्यांना नोकरी मिळालेली नाही. या सर्वानी अनेकदा पाठपुरावा करूनही संरक्षण संपत्ती महासंचालनालयाने याबाबतीत कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही.
सन 2क्क्6 मध्ये पुणो कॅन्टोन्मेंट बोर्डातील सफाई कर्मचारी पदासाठी 53 जणांनी अर्ज केला होता. त्यातील 3क् जणांना 2क्14 र्पयत नोकरी मिळाली. मात्र, 2क्14 र्पयत 23 जणांना नोकरी मिळाली नाही. कारण, तोर्पयत त्यांची वयोमर्यादेची अट संपली होती. मात्र, संरक्षण महासंचालनालयाच्या दिरंगाईमुळेच त्यांची वयाची अर्हता संपली होती. कॅन्टोन्मेंट बोर्डाचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) केवी नागीरेड्डी यांनी संबंधित अर्ज लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्या संरक्षण संपत्ती महासंचालनालयाला पाठविले होते. मात्र, त्यावर आजर्पयत प्रतिसाद दिला गेला नाही. दरम्यान, याठिकाणी संजीवकुमार यांनी सीईओ पदाचा पदभार स्वीकारला.
अनुकंपा तत्त्वावरील नोकरीची वाट पाहत असणारे आदिक सोनवणो, प्रकाश गुरय्या, दिनेश शेडगे आणि हेमंत कालवी यांच्यासह 23 जण सध्या खासगी ठिकाणी नोकरी करत आहेत. त्याठिकाणी ते तीन-साडेतीन हजार रुपयांवर उदरनिर्वाह करत आहेत. आदिक सोनवणो यांची आई पुणो कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये नोकरी करत होत्या. त्यांच्या जागी नोकरी मिळण्यासाठी आदिक यांनी अर्ज केला होता. प्रत्येक वेळी त्यांना जागा रिकामी झाल्यानंतर बोलाविण्यात येईल, असे सांगून परत पाठविण्यात आले.
आदिक म्हणाला, की अनुकंपा तत्त्वावरील भरतीसाठी त्यावेळी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. ती पाहून मी अर्ज केला. मात्र, आमची फाईल पुढे सरकलीच नाही. सफाई कर्मचा:यांसाठी 3क् वर्षाची वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. मात्र, योग्य वेळी नोकरी न मिळाल्याने आमचे वय वाढत गेले. 2 नोव्हेंबर 2क्13 रोजी आम्हाला मुलाखतीसाठी बोलावण्यात आले. 23 रोजी नियुक्तीपत्र देण्यात आले. मात्र, आतार्पयत नोकरी मिळाली नाही. आमचे वय बसत नसल्याने आम्हाला बोलाविण्यात आलेले नाही, हे आम्हाला नंतर समजले. मात्र, यामध्ये आमचा काहीच दोष नाही, असे प्रकाश गुरय्या यांनी सांगितले.(प्रतिनिधी)
या अजर्दारांना नोकरी मिळण्यासाठी पुणो कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. प्रत्येकाला अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळू शकत नाही. मात्र, जी प्रक्रि या आहे, त्यानुसारच भरती झाली पाहिजे. अजर्दारांचे वय वाढल्याचेही आम्ही संरक्षण विभागाला कळविले आहे. याबाबतीत त्यांनी आम्हाला जे प्रश्न किंवा माहिती विचारली आहे, ती सर्व वेळोवेळी दिली आहे.
- संजयकुमार,
सीईओ, पुणो कॅन्टोन्मेंट बोर्ड