पुणे विद्यापीठ परिसरातील रस्त्यांवर २४ तास जड वाहतूक बंद; पर्यायी मार्ग कोणते?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 11:34 AM2023-02-14T11:34:10+5:302023-02-14T11:36:26+5:30
पुढील आदेशापर्यंत २४ तास जड वाहतुकीस बंदी...
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक परिसर व गणेशखिंड रोड, बाणेर रोडवर मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे आता गणेशखिंड रोड, बाणेर रोड, पाषाण रोड, सेनापती बापट रोडवर पुढील आदेशापर्यंत २४ तास जड वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे.
गणेशखिंड रोड : संचेती चौक ते राजीव गांधी पूल
बाणेर रोड : राधा चौक ते शिवाजीनगरकडे येण्यासाठी.
पाषाण रोड : सूस ते शिवाजीनगरकडे येण्यासाठी.
सेनापती बापट रोड : लॉ कॉलेज रोडकडून सेनापती बापट रोड जंक्शनकडे येणारी वाहने.
सोलापूर रोडकडील हडपसर मार्गे येणारी व पुणे शहरातील मध्यवर्ती भागातून मुंबईकडे जाणारी जड वाहतूक, माल वाहतूक, भाजीपाला/तरकारी वाहतूक करणाऱ्या वाहनांना शहराचे मध्यवर्ती भागातून जाण्यास मनाई करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग - हडपसर गाडीतळ, सासवड रोड, मंतरवाडी फाटा, कात्रज काेंढवा रोडने खडी मशीन चौक, कात्रजमार्गे जातील.
नगर रोडने येणारी व पुण्यातील मध्यवर्ती भागातून मुंबईकडे जाणारी जड वाहतूक नगर रोड, खराडी बायपास, शास्त्रीनगर, आंबेडकर चौक, पोल्ट्रीफार्म चौकातून जुना पुणे-मुंबई महामार्गाने जातील.