मोरगावमध्ये २४ तास थ्रीफेज वीजपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:08 AM2021-06-03T04:08:46+5:302021-06-03T04:08:46+5:30
मोरगाव हे अष्टविनायकांपैकी प्रथम तीर्थक्षेत्र असून, येथे राज्यासह परराज्यातील, तर काही विदेशी भक्तगण मयूरेश्वरच्या दर्शनासाठी येतात. गावठाण ...
मोरगाव हे अष्टविनायकांपैकी प्रथम तीर्थक्षेत्र असून, येथे राज्यासह परराज्यातील, तर काही विदेशी भक्तगण मयूरेश्वरच्या दर्शनासाठी येतात. गावठाण हद्दीत मंदिराबरोबरच भक्तनिवास, लॉजिंग, हॉटेल, गारमेंट्स दुकान, किराणा, टॉली व ट्रक बांधणी कारखाना, आयसीयू हॉस्पिटल, सरकारी व पशुवैद्यकीय दवाखाना, मंगल कार्यालये आहेत. गावची लोकसंख्या पाच हजारच्या आसपास आहे. थ्रीफेज वीजपुरवठा चार दिवस दिवसा व दोन दिवस रात्रीचा असून केवळ ८ तास उपलब्ध असते. त्यातच विजेचा लंपडाव, शेतीपंप व व्यावसायिक दुकानातील विजेच्या कमी अधिक अधिभारामुळे वारंवार तांत्रिक बिघाड होत होता. याबाबत मोरगावचे सरपंच नीलेश केदारी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्रव्यव्हार करून मयूरेश्वर मंदिर व व्यावसायिकांसाठी थ्रीफेज वीजपुरवठा २४ तास सुरू ठेवण्याची विनंती केली होती. त्यानुसार मंगळवारी सुमारे दहा लाख रुपयांच्या अतिरीक्त वीज रोहित्राची जोडणी करून शेतीपंपासाठी लागणारा थ्रीफेज वीजपुरवठ्याची जोडणी वेगळी केली आहे . तर गावठाण हद्दीत थ्री फेज वीज पुरवठा बाराही महिने चोवीस तास राहणार असल्याचे महावितरण कंपनीचे शाखा अभियंता दिलीप नाळे यांनी सांगितले.