पुणेकरांना आता २४ तास समान पाणीपुरवठा..!; स्थायी समितीच्या बैठकीत निविदांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 03:39 PM2018-02-12T15:39:32+5:302018-02-12T15:40:54+5:30

गेल्या अनेक वषार्पासून केवळ चर्चा असलेल्या २४ बाय ७ पाणी पुरवठा योजनेला अखेर सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

24 hours water supply to Pune citizens! Approval of tender in standing committee meeting | पुणेकरांना आता २४ तास समान पाणीपुरवठा..!; स्थायी समितीच्या बैठकीत निविदांना मंजुरी

पुणेकरांना आता २४ तास समान पाणीपुरवठा..!; स्थायी समितीच्या बैठकीत निविदांना मंजुरी

googlenewsNext
ठळक मुद्देसहा पैकी पाच कामे एल अँड टी ला तर एक काम जैन एरिगेशनला देण्यास मान्यतासरासरी ११ टक्के कमी दराने आल्या सुमारे २३१५ कोटी रुपयांच्या निविदा

पुणे : गेल्या अनेक वषार्पासून केवळ चर्चा असलेल्या २४ बाय ७ पाणी पुरवठा योजनेला अखेर सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. शहराला चोवीस तास पाणीपुरवठा योजनेतील पाईप लाईन, केबल डक्ट, पाणी मीटर आणि मेन्टनन्सच्या कामाच्या सहा पैकी पाच कामे एल अँड टी ला तर एक काम जैन एरिगेशनला देण्यास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे आता पुणेकरांना २४ तास समान पाणीपुरवठा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
चोवीस तास पाणीपुरवठा योजनेसाठी पालिकेने सहा पॅकेजमध्ये निविदा मागविल्या आहेत. सुमारे २३१५ कोटी रुपयांच्या या निविदा सरासरी ११ टक्के कमी दराने आल्या असून महापालिकेला २०५० कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. सहा पॅकेजमध्ये ‘एल अँड टी’  कंपनीची सर्वात कमी आली आहे. त्यामुळे हे काम याच कंपनीला मिळणार हे निश्चित होते. परंतु महापालिकेच्या निविदा प्रक्रियेच्या संकेतानुसार कोणत्याही मोठ्या प्रकल्पाचे काम एकाच कंपनीला दिल्यास त्या कंपनीच्या कारभारात एकाधिकारशाही निर्माण होते. प्रसंगी बदलत्या परिस्थितीनुसार कंपनी स्वत: च्या मागण्या रेटून नेत त्यांना हवे ते निर्णय घेऊ शकते. किंबहुना कामही अर्धवट ठेऊ शकते. असे झाल्यास प्रकल्प बंद पडणे अथवा रेंगाळू शकतो. त्यामुळे एखाद दुसऱ्या प्रकल्पाचे काम सेकंड लोवेस्ट निविदा भरलेल्या कंपनीला देण्यात येते. त्यानुसार एका कामाची निविदा जैन एरिगेशनला देण्यात आली आहे.

Web Title: 24 hours water supply to Pune citizens! Approval of tender in standing committee meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.