गांधी जयंतीनिमित्त येरवडा कारागृहातील 24 कैदी हाेणार मुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2018 12:58 PM2018-10-02T12:58:59+5:302018-10-02T13:10:44+5:30
गांधीजींच्या 150 व्या जयंतीनिमित्त येरवडा कारागृहातील 24 कैद्यांची मुक्तता करण्यात येणार अाहे. येत्या 5 अाॅक्टाेबर राेजी या कैद्यांना शिक्षेतून मुक्त करण्यात येणार अाहे.
- राहुल गायकवाड
पुणे : महात्मा गांधी यांनी अंहिसा, शांती, क्षमा या मुल्यांची शिकवण अायुष्यभर दिली. चुकीचा पश्चाताप झालेल्याला सुधारण्याची एक संधी द्यायाला हवी असे गांधीजींचे विचार हाेते. गांधीजींच्या 150 व्या जयंतीनिमित्त येरवडा कारागृहातील 24 कैद्यांची मुक्तता करण्यात येणार अाहे. येत्या 5 अाॅक्टाेबर राेजी या कैद्यांना शिक्षेतून मुक्त करण्यात येणार अाहे. अशी माहिती येरवडा कारागृहाचे अधिक्षक यु. टी. पवार यांनी लाेकमतशी बाेलताना दिली.
महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती निमित्त चांगल्या वर्तनुकीच्या 24 कैद्यांना मुक्त करण्यात येणार अाहे. यात 19 पुरुष तर 5 महिला कैद्यांचा समावेश अाहे. राज्य सरकारने महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त 24 कैद्यांना साेडण्याचा निर्णय घेतला अाहे. यु. टी. पवार म्हणाले, महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती निमित्त राज्य सरकारच्यावतीने चांगल्या वर्तनुकीच्या 24 कैद्यांना साेडण्याचा निर्णय घेण्यात अाला अाहे. त्यानुसार ज्यांची निम्म्याहून अधिक शिक्षा भाेगून झाली अाहे तसेच ज्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल नाहीत अशा कैद्यांची उर्वरीत शिक्षा माफ करण्यात येणार अाहे. येत्या पाच अाॅक्टाेबर राेजी या कैद्यांची मुक्तता करण्यात येणार अाहे. या 24 कैद्यांना पुढील अायुष्यासाठी अाज शुभेच्छा देण्यात अाल्या.
गांधीजींना राजद्रोहाच्या आरोपाखाली 18 मार्च 1922 राेजी अहमदाबाद न्यायालयाने सहा वर्षांची शिक्षा सुनावली होती. ही शिक्षा भोगण्यासाठी त्यांना पुण्यातील येरवडा कारागृहात आणण्यात आले हाेते. गांधीजींना ज्या खाेलीत ठेवण्यात अाले हाेते. त्या खाेलीचे जतन कारागृह प्रशासनाकडून करण्यात अाले अाहे. दरवर्षी गांधी जयंतीनिमित्त ही खाेली कैद्यांना पाहण्यासाठी खुली केली जाते. यंदा गांधी जयंतीचे 150 वे वर्ष असल्याने गांधीजींवर तयार करण्यात अालेल्या चित्रपटांच्या पाेस्टरचे प्रदर्शन या खाेलीत भरविण्यात अाले हाेते. हे प्रदर्शन कैद्यांना पाहण्यासाठी खुले ठेवण्यात अाले हाेते. त्याचबराेबर विविध भजनाचे कार्यक्रमही कारागृहात घेण्यात अाले.