नीरा खोऱ्यातील धरणांत २४.०९ टक्के उपयुक्त पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:11 AM2021-05-27T04:11:07+5:302021-05-27T04:11:07+5:30

नीरा : जिल्ह्यातील पुरंदर, बारामती, इंदापूर तसेच सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण व पुढे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जिवनदायनी असलेले पुणे- ...

24.09 per cent usable water storage in Nira valley dams | नीरा खोऱ्यातील धरणांत २४.०९ टक्के उपयुक्त पाणीसाठा

नीरा खोऱ्यातील धरणांत २४.०९ टक्के उपयुक्त पाणीसाठा

Next

नीरा : जिल्ह्यातील पुरंदर, बारामती, इंदापूर तसेच सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण व पुढे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जिवनदायनी असलेले पुणे- सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील वीर धरणात २६ मे अखेर ६०.१५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तर नीरा खोऱ्यातील नीरा देवघर, भाटघर, वीर आणि गुंजवणी या चारही धरणांत २४.०९ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याचे जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

गतवर्षी नीरा खोऱ्यातील नीरा देवघर, भाटघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडल्याने यंदा मेअखेरीस नीरा खोऱ्यातील धरणांत समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध आहे. यंदा रब्बी हंगामाबरोबर उन्हाळी हंगामात पाण्याचे आवर्तन सलग सुरू राहिल्याने याचा शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

नीरा खोऱ्यातील धरणांतील पाणीसाठ्याचा २६ मे रोजी आढावा घेतला असता नीरा देवघर धरणात १ हजार ८५५ द.ल.घ.फूट उपयुक्त पाणीसाठा असून त्याची टक्केवारी १५.८२ टक्के आहे. तर ब्रिटिशकालीन भाटघर धरणांत २ हजार ६२१ द.ल.घ.फूट उपयुक्त पाणीसाठा असून त्याची टक्केवारी ११.१५ टक्के आहे. तसेच, वीर धरणामध्ये ५ हजार ६५९ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा असून त्याची टक्केवारी ६०.१५ टक्के आहे. तर गुंजवणी धरणांत १ हजार ५०६ द.ल.घ.फूट उपयुक्त पाणीसाठा असून त्याची टक्केवारी ४०.८१ टक्के आहे.

एकंदरीत नीरा खोऱ्यातील नीरा देवघर, भाटघर, वीर व गुंजवणी या चारही धरणांत २६ मे रोजी सकाळी सहा वाजता २४.०९ टक्के पाणीसाठा उपयुक्त असल्याची माहिती नीरा पाटबंधारे कार्यालयाचे उपविभागीय अधिकारी अशोक चव्हाण यांच्याकडून देण्यात आली आहे.

वीर धरणमध्ये मुबलक पाणीसाठा असल्यामुळे नीरा खोऱ्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळच्या वेळी उसाच्या शेतीला पाणी मिळाले. नुकत्याच गहू, हरभरा, टोमॅटो, कांदा आदी पिकांची काढणी झालेल्या शेतात चारा पिकांचे उत्पादन घेता आले. त्यामध्ये कडवळ, मका, घास ही पिके घेता आली. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात जनावरांच्या हिरव्या चाऱ्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.

वीर धरणातून सासवड नगरपालिकेला पाणीपुरवठा करण्यात येतो. तसेच, नीरा नदीवरील मांडकी डोहातून जेजुरी नगरपालिका व एमआयडीसीला देखील उन्हाळ्यात पाणीपुरवठा केला जातो. नीरा नदी व डाव्या कालव्यावरून पुरंदरमधील लपतळवाडी, मांडकी, जेऊर, पिंपरे (खुर्द), पिसुर्डी, गुळुंचे, कर्नलवाडी, राख आदी गावातील शेतकऱ्यांनी सहकारी उपसा सिंचन योजना राबवून शेतीसाठी पाणी नेले आहे. या भागातील बहुतांश शेतकऱ्यांना ठिबक सिंचन करून फळ बागा लावल्या आहेत. या शेतकऱ्यांना ही या वर्षी पाण्याची चिंता राहिली नाही.

दरम्यान, नीरा उजवा कालव्यातून १ हजार ५५० क्युसेकने विसर्ग, तर नीरा डाव्या कालव्यातून ८२७ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. ३० जुन रोजी पर्यंत नीरा डाव्या कालव्यातून विसर्ग सुरू राहणार आहे.

२६ नीरा

===Photopath===

260521\26pun_10_26052021_6.jpg

===Caption===

२६ नीरा

Web Title: 24.09 per cent usable water storage in Nira valley dams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.