मंगळवारी २४३ कोरोनाबाधित : २०८ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:20 AM2021-09-02T04:20:22+5:302021-09-02T04:20:22+5:30
पुणे : शहरात मंगळवारी २४३ कोरोनाबाधित आढळून आले असून, २०८ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ आज विविध तपासणी केंद्रांवर ...
पुणे : शहरात मंगळवारी २४३ कोरोनाबाधित आढळून आले असून, २०८ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ आज विविध तपासणी केंद्रांवर ७ हजार ८४० संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ३.०९ टक्के इतकी आढळून आली आहे.
शहरातील सक्रिय रुग्ण संख्या २ हजार २६५ इतकी आहे. आज दिवसभरात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी २ जण हे पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील आजचा मृत्यूदर हा १.८० टक्के इतका आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रुग्ण संख्या ही २०४ इतकी असून, आॅक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २७९ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत ३१ लाख ३३ हजार ३११ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ९५ हजार ५८६ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ८४ हजार ३९५ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ९२६ जणांचा मृत्यू झाला आहे.
पुण्यातील कोरोनास्थिती -
मंगळवारी बाधित - २४३
घरी सोडले - २०८
एकूण बाधित रुग्ण - ४,९५,५८६
सक्रिय रुग्ण - २,२६५
आजचे मृत्यू - ०६
एकूण मृत्यू - ८,९२६