खेडमधील फेरफार अदालतीत २४३ नोंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:11 AM2021-01-22T04:11:16+5:302021-01-22T04:11:16+5:30
पुणे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या आदेशानुसार करोना काळातील महसुल विभागातील तलाठी आणि मंडलस्तरीय विविध प्रकारच्या नोंदीसह तक्रारी व ...
पुणे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या आदेशानुसार करोना काळातील महसुल विभागातील तलाठी आणि मंडलस्तरीय विविध प्रकारच्या नोंदीसह तक्रारी व प्रलंबित कामाचा निपटारा करण्यात येत आहे.खेड तालुक्यातील ९ मंडलनिहाय ऑगस्टअखेर साध्या ४७० ,वारस नोंदी १३८, तक्रारी ४३३ अशा एकूण १०४१ नोंदी प्रलंबित होत्या. बुधवार दि.१८ जानेवारीला तालुक्यातील खेड,आळंदी,चाकण,शेलपिंपळगाव, कनेरसर, पाईट, कडुस,वाडा आणि कुडे बु.येथे प्रांत विक्रांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली फेरफार अदालतीचे आयोजन करुन प्रलंबित तक्रारीचा निपटार संबंधित गावच्या तलाठ्यांच्या उपस्थित मंडलाधिकारी चेतन चासकर, राजेंद्र वाघ,सविता घुमटकर, हरिदास सोनवणे,सिताराम तुरे, विजय घुगे, शरद गोडे यांनी तक्रारदार यांना बोलावुन प्रलंबित अर्जावर चर्चा करुन संमतीने प्रलंबित प्रश्नाबाबत निवारण केले. या फेरफार अदालतीमधून साध्या प्राप्त तक्रारी १६०, वारसनोंदी ७०, तर १३ तक्रारी अशा एकूण ३१० प्रलंबित प्रश्न सोडवण्यात आले असताना ७९८ प्रलंबित नोंदीबाबत दर महिन्याला मंडलनिहाय फेरफार अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे.