मुळा नदीतील जलपर्णीने होणाऱ्या डासांच्या उपद्रवामुळे २५ ते ३० हजार नागरिक त्रस्त, जलपर्णी मुक्त नदीसाठी तातडीने उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 12:47 PM2021-03-15T12:47:15+5:302021-03-15T12:48:43+5:30
भाजप पुणे चिटणीस सुनील माने यांनी खासदार गिरीश बापट यांना दिले होते निवेदन, बापट यांचे निवेदन विक्रम कुमार यांच्याकडे आज सुपूर्त करण्यात आले
मुळा नदीतील वाढलेल्या जलपर्णी मुळे पुणे, पिंपरी चिंचवड तसेच खडकी कॅन्टोमेंट परिसरातील लोकांना त्रास होत असून त्यामुळे निर्माण होणाऱ्या डासांच्या उपद्रवामुळे नागरिकांना आरोग्याच्या चिंताजनक परिस्थितीतीला सामोरे जावे लागत आहे.
जलपर्णी काढण्याबाबत तातडीने उपाय योजना करव्यात आशा सूचना खासदार गिरीश बापट यांनी पुणे तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांना दिल्या आहेत. भाजप पुणे चिटणीस सुनील माने यांनी खासदार गिरीश बापट यांना मुळा नदीतील वाढलेल्या जलपर्णी हटवण्याबाबत लक्ष घालण्यासबंधी निवेदन दिले होते. या निवेदनाला अनुसरून खासदार बापट यांनी पुणे तसेच पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांना पत्र देऊन मुळा नदीतील जलपर्णी आणि त्यामुळे होणाऱ्या डासांच्या प्रादुर्भावाबाबत त्वरित उपाययोजना करण्यासाठी संबधितांना आदेश देण्याच्या सूचना केल्या आहेत. खासदार बापट यांचे हे पत्र सुनील माने यांनी पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांना आज दिले. यावेळी त्यांच्या सोबत सभागृहनेते गणेश बीडकर उपस्थित होते. आयुक्त विक्रम कुमार यांनी आजच सभागृहनेते गणेश बीडकर यांच्या सोबत या कामाची पाहणी करण्याचे आश्वासन दिले.
मुळा नदीतील वाढलेल्या जलपर्णी मुळे मोठ्या प्रमाणावर डास झाले आहेत. डासांच्या उपद्रवाने औंधरोड, बोपोडी, सांगवी, पिंपळे गुरव, साप्रस, विश्रांतवाडी, मुळा रोड, बोपखेल या सर्व परिसरातील सुमारे २५ ते ३० हजार नागरिक त्रस्त झाले आहेत. डासांमुळे लोकांच्या आरोग्याचा ही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांकडून वारंवार तक्रार करूनही प्रशासन याबाबत तोडगा काढत नाही. त्यामुळे आपण याबाबत लक्ष घालून पिंपरी चिंचवड, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड तसेच पुणे महानगरपालिका या तिन्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रमुखांची तातडीने बैठक घेऊन नगरिकांना या त्रासातून मुक्त करण्याची मागणी या निवेदनाद्वारे सुनील माने यांनी केली होती.