खासगी प्रवासी वाहनांकडून २५ टक्के दरवाढ, प्रवाशांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:14 AM2021-08-18T04:14:38+5:302021-08-18T04:14:38+5:30

रोजच्या वाढणाऱ्या महागाईला मुख्य पेट्रोल व डिझेलची दर वाढ कारणीभूत ठरत आहे. दरवाढीचे कारण देत प्रत्येक ठिकाणी महागाई वाढवली ...

25 per cent fare hike from private passenger vehicles, hit passengers | खासगी प्रवासी वाहनांकडून २५ टक्के दरवाढ, प्रवाशांना फटका

खासगी प्रवासी वाहनांकडून २५ टक्के दरवाढ, प्रवाशांना फटका

Next

रोजच्या वाढणाऱ्या महागाईला मुख्य पेट्रोल व डिझेलची दर वाढ कारणीभूत ठरत आहे. दरवाढीचे कारण देत प्रत्येक ठिकाणी महागाई वाढवली जात आहे. यामुळे सर्वसामान्य जनता हवालदिल झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक वाहतुकीऐवजी खासगी वाहन भाडेतत्त्वावर घेऊन सुरक्षित प्रवास करण्याला पसंती दिली जात आहे. मात्र प्रतिकिमी दर वाढल्याने आर्थिक झळ सोसावी लागत आहे. याचबरोबरीने वाहनचालकांना देखील याचा फटका बसला आहे. धंदा कमी झाल्याने आर्थिक उत्पन्न घटले असून दैनंदिन खर्चदेखील भागवणे कठीण होऊन बसले आहे.

चौकट

असे वाढले पेट्रोल-डिझलेचे दर (प्रतिलिटर)

पेट्रोल डिझेल

जानेवारी - २०१९ ७४.१६ ६२.२४

जानेवारी २०२० ९१.८० ८२.१३

जानेवारी २०२१ ९५ ८५

ऑगस्ट २०२१ १०७.३९ ९५.५४

प्रवासी वाहनांचे प्रतिकिमी दर

वाहनाचा प्रकार प्रतिकिमी दर

अ) चारचाकी १४ रुपये

ब) २५ सिटर बस १८ रुपये

क) टेम्पो ट्रॅव्हलर १६ रुपये

गाडीचा हप्ता कसा भरणार?

कोरोनामुळे व्यवसायावर मोठे संकट आले आहे. गेल्या दीड वर्षांपासून धंदा बंद होता. आता कुठे सुरूवात होत होती, तर पेट्रोल व डिझेलचे दर वाढले आहेत. परिणामी वाहतुकीच्या प्रतिकिमीमध्ये मागच्यापेक्षा २५ ते ३० टक्के वाढ झाली आहे. प्रवाशी घटले आहेत. धंदा नसल्याने आर्थिक उत्पन्न घटले आहे. त्यामुळे हप्ते थकले आहेत.

- अक्षय शेलार, वाहनचालक

सर्व काही सुरळीत होत असले तरी, पर्यटनस्थळे बंद आहेत. लग्नसोहळ्यावर मर्यादा आहेत. सांस्कृतिक कार्यक्रम नसल्याने लोक बाहेर पडत नाहीत. आयटी क्षेत्र बंद आहे. त्यामुळे मुख्य प्रवाशीच नाहीत. किरकोळ धंदा सुरू आहे. यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणे कठीण आहे. पैसेच उरत नसल्याने बँकेचे हप्ते थकले आहेत.

अमीर शेख, वाहनचालक

Web Title: 25 per cent fare hike from private passenger vehicles, hit passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.