बारामती लोकसभा मतदारसंघातील रस्त्यांसाठी २५ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:11 AM2021-04-23T04:11:37+5:302021-04-23T04:11:37+5:30
आपल्या मतदारसंघातील विविध रस्ते बांधणी, पूल उभारणी तसेच सध्याच्या काही रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी सुप्रिया सुळे यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा सुरू ...
आपल्या मतदारसंघातील विविध रस्ते बांधणी, पूल उभारणी तसेच सध्याच्या काही रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी सुप्रिया सुळे यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा सुरू होता. त्यास सकारात्मक प्रतिसाद देत आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने निधी जाहीर केला आहे, असे सुळे यांनी म्हटले आहे.
निधी मंजूर झालेल्या रस्त्यांमध्ये बारामती व इंदापूर तालुक्याला जोडणा-या बारामती-जळोची-कण्हेरी-लाकडी-कळस-लोणी देवकर या रस्त्यासाठी ४ कोटी ९१लाख ४८ हजार (४९१.४८ लाख) रुपये मंजूर करण्यात आले आहेत. इंदापूर तालुक्यातील वरकुटे खुर्द-वडापुरी-गलांडेवाडी नं. २ या रस्त्यासाठी ४ कोटी ९१ लाख ४ हजार (४९१.४ लाख) रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
पुरंदर तालु्क्यातील चांबळी कोडीत-नारायणपूर-बहिरटवाडी काळदरी या २८ किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी ४कोटी ९१लाख ३४ हजार (४९१.३४ लाख) तर सासवड-राजुरी-सुपा रस्त्यासाठी ४ कोटी ९१ लाख ४० हजार (४९१.४० लाख) रुपये मंजूूर करण्यात आले आहेत. याबरोबरच वेल्हे तालुक्यातील महाड-मढेघाट-नसरापूर ते चेलाडी या ३१ किमी अंतराच्या रस्त्यासाठी ४ कोटी ८१ लाख ४४ हजार (४८१.४४ लाख) रुपये मंजूर झाले आहेत.