जिल्हयातील २५ न्यायाधीशांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 07:32 PM2018-04-13T19:32:16+5:302018-04-13T19:32:16+5:30
मुंबई उच्च न्यायालयातर्फे प्रतिवर्षीप्रमाणे राज्यातील न्यायाधीशांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
पुणे : जिल्ह्यातील एकूण २५ न्यायाधीशांच्या बदल्या करण्यात आल्या आहे. तर २२ नव्या न्यायाधीशांची पुण्यात बदली झाली आहे. तसेच जिल्ह्यामधील विविध न्यायालयांतल्या ६ न्यायाधीशांना एक वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे.
धर्मादाय सहआयुक्त शिवाजी कचरे यांची बदली झाली असून त्यांच्या जागी मुंबईत कार्यरत असणारे डी. एम. देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रदीप अष्टूरकर यांना एक वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयातर्फे प्रतिवर्षी प्रमाणे राज्यातील न्यायाधीशांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्यातील २९१ न्यायाधीशांच्या बदल्या करण्यात आल्या आहे. त्याचप्रमाणे काहींना मुदतवाढ मिळाली आहे. पुण्यातील आर. एच. मोहम्मद, एस. जे. घरात, एस. एस.सावंत, एम. एन. सलीम, एन. के. मनेर, एस. बी. भालकर अशी काही बदली करण्यात आलेल्या न्यायाधीशांची नावे आहेत. तर जे. एन. राजे, आर. जी. देशपांडे, ए. एस. भईसरे, एस. आर. कफरे, जी. पी. अगरवाल , एन. आर. नाईकवाडे हे नवीन न्यायाधीश जिल्ह्यात येणार आहेत. जिल्ह्यातील १३ न्यायाधीश आणि १२ वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीशांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यांच्याजागी नवीन न्यायाधीश रूजू होणार आहेत.