राजुरी, उंचखडक गावांसाठी२५ लाखांचा निधी मंजूर.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:14 AM2021-09-12T04:14:04+5:302021-09-12T04:14:04+5:30

नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हा नियोजन समिती सदस्य एकनाथ पवार यांच्या निधीतून राजुरी ते दावल मलिक रस्ता ...

25 lakh sanctioned for Rajuri, Unchkhadak villages. | राजुरी, उंचखडक गावांसाठी२५ लाखांचा निधी मंजूर.

राजुरी, उंचखडक गावांसाठी२५ लाखांचा निधी मंजूर.

Next

नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हा नियोजन समिती सदस्य एकनाथ पवार यांच्या निधीतून राजुरी ते दावल मलिक रस्ता मजबुतीकरण करणे कामासाठी दहा लाख रुपये, जयश्री गावडे यांच्या निधीतून राजुरी ते उपाळी मळा जोड रस्ता मजबुतीकरण करणे दहा लाख ,तसेच श्याम लांडे यांच्या निधीतून उंच खडक ते आबा टेक जोड रस्ता मजबुतीकरण करणे कामासाठी पाच लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.

याकामी आमदार अतुल बेनके, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार, माजी सभापती दीपक औटी, कैलास पाटील औटी, राजुरी व उंच खडक गावचे सरपंच व उपसरपंच सर्व सदस्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले. याबाबत सतीश पाटील औटी यांनी पाठपुरावा केला.

या रस्त्यांची खूप दुरवस्था झाली होती. स्थानिक ग्रामस्थ यांनी वेळोवेळी रस्तादुरुस्तीची मागणी केली होती, याबाबत स्थानिक ग्रामस्थ यांनी रस्त्याच्या कामांना मंजुरी मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

Web Title: 25 lakh sanctioned for Rajuri, Unchkhadak villages.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.