उजनी धरणात अवघा २५ टक्के पाणीसाठा शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 02:20 AM2019-01-30T02:20:23+5:302019-01-30T02:20:42+5:30

पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली धनदांडग्यांचे मळे फुलविण्याचे काम सुरू

25 percent water stock in Ujani dam | उजनी धरणात अवघा २५ टक्के पाणीसाठा शिल्लक

उजनी धरणात अवघा २५ टक्के पाणीसाठा शिल्लक

Next

- सुरेश पिसाळ 

भिगवण : उजनी धरणातून सोलापूरला पिण्यासाठी पाणी सोडल्याने पाणीपातळीत झपाट्याने घट झाली आहे. अवघा २५ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. यामुळे उजनीकाठचे शेतकरी, तसेच नागरिकांचा पाणीप्रश्न येत्या काळात गंभीर होण्याची शक्यता आहे. पाण्याच्या जिवावर शेतातील पिकासाठी काढलेली लाखोंची कर्जे माफ होत नसल्याने बळीराजासमोर संकटे ‘आ’वासून उभी आहेत.
या वर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्याने आधीच अडचणीत आलेली शेती आता पाण्याच्या संकटात सापडणार आहे. त्याची धास्ती शेतकरीवर्गाला पडली आहे. दररोज पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत असल्याने पाणीसाठ्याची भीषण स्थिती निर्माण होणार आहे.

गतवर्षी खडकवासला धरणसाखळीत मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने यंदा उजनी धरण शंभर टक्के भरले होते. मात्र, पाण्याचे योग्य पद्धतीने नियोजन न झाल्याने जानेवारीतच पाण्याचे संकट गडद झाले आहे. दुष्काळाचा सगळ्यात मोठा फटका उजनी धरण परिसरातील शेतकऱ्यांना बसू लागला आहे. ज्यांनी धरण उभारणीसाठी गावेच्या गावे आणि उभे संसार पाण्याखाली घालवले, त्यांनाही पीके जगविण्यासाठी धडपड करावी लागत आहे. डोळ्यांसमोरून धरणातील पाणी लांब-लांब जाताना दिसत आहे. पण, धरणग्रस्त शेतकरी पाण्यासाठी तडफडत आहे.

सध्या धरणातील पाणी मोठ्या प्रमाणावर पिण्याच्या पाण्यासाठी सोलापूर शहर आणि परिसरासाठी सोडले आहे. जलाशयातील पाणीसाठा कमालीचा खालावल्याने या हजारो शेतकºयांना आपली पिके वाचविण्यासाठी आता धडपड करावी लागत आहे. तालुक्यातील अनेक गावांच्या पाणी योजना आजच्या घडीला संकटात आल्या आहेत. ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी धावपळ करावी लागणार आहे.

धरण प्राधिकरणाची निर्मिती गरजेची
उजनी धरणावर पुणे, सोलापूर, नगरसह उस्मानाबाद जिल्ह्यातील लाखो हेक्टर शेतीसह औद्योगिक कारखानदारांचे भवितव्य अवलंबून आहे. पाण्याचे दरवर्षी योग्य नियोजन
होत नसल्याने अनेक दिवसांपासून उजनी धरण प्राधिकरण नियामक मंडळाची निर्मितीची मागणी आता जोर धरू
लागली आहे.

वाद उफाळून येण्याची शक्यता...
सोलापूरला पिण्याच्या नावाखाली लाखो लिटर पाण्याची उधळपट्टी होत असल्याने धरणग्रस्त शेतकºयांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला. आता आगामी निवडणुकांच्या तोंडावर सोलापूर आणि धरणग्रस्त शेतकरी वाद उफाळून येण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.

Web Title: 25 percent water stock in Ujani dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.