काळेवाडीला २५ प्रकल्पांचे सादरीकरण
By admin | Published: December 25, 2015 01:50 AM2015-12-25T01:50:34+5:302015-12-25T01:50:34+5:30
काळेवाडी येथील स्व. सुभाष बाबूराव कुल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आंतरशालेय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते
दौंड : काळेवाडी (ता. दौंड) येथील स्व. सुभाष बाबूराव कुल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आंतरशालेय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनामध्ये २५ विज्ञान प्रकल्पांसाठी ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वतीचे पूजन रामभाऊ काळे यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रदर्शनामध्ये घरगुती हवा शीतकरण यंत्र, जलव्यवस्थापण, तुषार सिंचन, लोहचुंबकापासून वीजनिर्मिती, आदर्श गाव संकल्पना, शेततळे नियोजन, प्रदूषण नियंत्रण, सौर उर्जेचा वापर इत्यादी प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले. या स्पर्धा दोन गटांत झाल्या. त्याचबरोबर वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या वेळी राजेंद्र पासकर, चांगदेव ढवळे, बाबुराव गायकवाड, भागवत काळे, दादा कतुरे, दत्तोबा भोसले, बलभीम काळे, सुदाम गायकवाड, किसनराव काळे, एकनाथ भोसले इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विज्ञान शिक्षक संदीप लोखंडे, मनीषा शिंदे, मुख्याध्यापक भाऊसाहेब शिर्के यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमासाठी कैलास काशिद, सुनीता काळे, गणेश कदम, किशोर रंधवे, अमोल कदम यांचे सहकार्य मिळाले. सूत्रसंचालन सूर्यकांत साठे यांनी तर आभार एस. आर. लोखंडे यांनी मानले.